Gold Price Surge  meta ai
बिझनेस

Gold Price Hike: सोन्याचा भाव ₹२ लाखांवर जाणार? पुढील २-३ महिन्यांत मोठी तेजी येण्याची शक्यता, तज्ज्ञांनी सांगितला अंदाज

Gold Price Surge: सोन्याच्या दरात सातत्याने तेजी दिसत असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,६३,९७० वर पोहोचला आहे. पुढील २-३ महिन्यांत ₹२ लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता चर्चेत आहे.

Sakshi Sunil Jadhav

सोन्याच्या दरातली तेजी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे पुढच्या २ ते ३ महिन्यांत सोन्याचा दर २ लाख रुपयांच्या पातळीवर पोहोचणार का? याकडे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचं लक्ष लागलं आहे. तज्ज्ञांच्या मते, जागतिक आर्थिक परिस्थिती, अमेरिकेतील महागाई, डॉलरची हालचाल आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाचा सोन्याच्या दरावर मोठा परिणाम होऊ शकतो. दरम्यान, आगामी सणासुदीचा आणि लग्नसराईचा हंगाम सोन्याच्या मागणीला आणखी आधार देण्याची शक्यता आहे.

काम ज्वेलरीचे संस्थापक कॉलिन शाह यांनी सोन्याच्या सध्याच्या तेजीबाबत महत्त्वाचं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, “सोन्याच्या दरातील तीव्र तेजी ही बदलत्या जागतिक आर्थिक परिस्थितीत सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून सोन्याचे असलेले महत्त्व अधोरेखित करते. यापूर्वी सोन्याच्या दरातील तेजीला अडथळा ठरलेल्या काही घटकांमध्ये बदल झाल्याने सध्याच्या तेजीला मोठा वेग मिळाला आहे. आगामी काळात अमेरिकेतील महागाईची आकडेवारी, डॉलरची हालचाल आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाबाबतची स्पष्टता यांचा सोन्याच्या दराच्या दिशेवर प्रभाव राहणार आहे. मात्र, मध्यम कालावधीत सोन्याला भक्कम आधार मिळत राहण्याची अपेक्षा आहे.”

“भारतात सोन्याच्या वाढलेल्या किमतींमुळे ग्राहक आपल्या खरेदीबाबत अधिक मूल्यकेंद्री आणि नियोजनबद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांकडून दागिन्यांची खरेदी पूर्णपणे कमी होण्याऐवजी हलके, आकर्षक डिझाइन असलेले आणि अधिक मूल्य देणारे दागिने खरेदी करण्याला प्राधान्य मिळू शकते. आगामी सणासुदीचा आणि लग्नसराईचा काळ दागिन्यांच्या मागणीला आधार देत राहील. भारतीय संस्कृतीत सोने हे उत्सवाबरोबरच दीर्घकालीन संपत्ती जतन करण्याचे साधन म्हणूनही महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी सांगितले.

मात्र, सोन्याच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीनंतर अल्पावधीत दरात स्थिरता किंवा चढ-उतार पाहायला मिळू शकतात, विशेषतः बदलत्या भूराजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, असेही शाह यांनी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम'

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

धक्कादायक! बिल भरण्यावरून वाद; बार मॅनेजरला चौघांनी बेदम मारहाण|VIDEO

SCROLL FOR NEXT