Gold Investment Saam Tv
बिझनेस

Gold Investment : २०१९ मध्ये सोनं ₹३० हजार तोळा, आता एक लाखांच्या पार; ज्यानं गुंतवणूक केली तो लखपती झाला, वाचा

Gold Price Hike Reasons: सोन्याच्या किंमती या दिवसेंदिवस वाढत आहेत आणि इथून पुढेही नेहमी वाढतच जाणार आहेत. गेल्या ६ वर्षात सोन्याचे दर २०० टक्क्यांनी वाढले आहेत.

Siddhi Hande

  • सोन्याच्या दरात २०० टक्क्यांनी वाढ

  • शेअर मार्केटपेक्षाही जास्त परतावा

  • सोन्यातील गुंतवणूक नेहमी फायद्याची

सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून सतत वाढ होत आहे. सोन्याचे दर कमी होतच नाही. इथून पुढेही सोन्याचे दर कमी होणार नाही. जर सोन्याच्या दरात थोडाफार चढ-उतार झाला तर तो तात्पुरता असेल. त्यामुळे सोने घेणे हे सर्वांसाठी फायद्याचेच असणार आहे. सोने घेणे ही एक प्रकारची गुंतवणूक असणार आहे. सोन्याने गेल्या अनेक वर्षात खूप जास्त परतावा दिला आहे.

जागतिक, आर्थिक बाजारातील अनिश्चितता, चलनविषयक सुलभता आणि चलनवाढ आणि मध्यमवर्ती बँका आणि किरकोळ गुंतवणूकदारांकडून मागणी वाढल्यामुळे शेअर बाजारापेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली. सोन्यातील गुंतवणूक यापेक्षाही जास्त परतावा देतो.

सहा वर्षात सोन्याच्या दरात २०० टक्क्यांनी वाढ (Gold Price Hike By 200 Percent in 6 Years)

मे २०१९ ते २०२५ पर्यंत सोन्याच्या किंमती खूप वाढल्या आहेत.सोन्याच्या किंमती जवळपास ३०,००० रुपयांवरुन १ लाख रुपये झाल्या आहेत. या प्रति तोळा सोन्याच्य किंमती आहेत. यावरुन असं लक्षात येतं की, सोन्याच्या किंमतीत सहा वर्षात २०० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. तर निफ्टिने ५० ते १२० टक्के परतावा दिला आहे. २०१५ पासून सोन्याने सेन्सेक्स आणि निफ्टीपेक्षा परतावा दिला आहे.

सोन्याच्या किंमती कशामुळे वाढतात? (Why Did Gold Price Hike)

सोन्याच्या किंमती आर्थिक अनिश्चितता, चलनवाढ आणि राजकीय तणावामुळे वाढत आहेत. इराण-इस्त्रायल युद्धाचाही परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे.

गेल्या सहा वर्षात कोविड, रशिया-युक्रेन युद्ध, महागाई, मंदावलेली जागतिक आर्थिक वाढ आणि बँकेची खरेदी यासारख्या गोष्टींचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत आहे.

सोन्यातील वाढ अशी सुरु राहिल का?

राजकीय परिस्थिती आणि धोरणांची अनिश्चितता, विशेष म्हणजे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या टॅरिफ धोरणामुळे सोन्याच्या किंमती वाढू शकतात. परंतु व्यापार धोरणामुळे किंमती अद्याप पूर्णपणे निश्चित केलेली नाही.तसेच अमेरिकन फेडरल रिझर्व्ह आणि जागतिक स्तरावरील बँकांनी व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात सोन्याने चांगला परतावा दिला आहे. त्यानंतर उरलेल्या सहा महिन्यातदेखील हा नफा असाच वाढत जाईल, असं तज्ज्ञांचे मत आहे.

२०१९ मध्ये सोन्याचा दर किती होता?

२०१९ मध्ये सोन्याचा दर प्रति तोळा सुमारे ₹३०,००० होता.

आज सोन्याची किंमत किती आहे?

२०२५ मध्ये सोन्याची किंमत ₹१ लाखाच्या पार गेली आहे, म्हणजेच ६ वर्षात २००% परतावा मिळाला आहे.

सोन्याचे दर का वाढले?

जागतिक आर्थिक अनिश्चितता, चलनवाढ, राजकीय तणाव, आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याचे दर सतत वाढले आहेत.

सोन्यात गुंतवणूक करणे फायदेशीर आहे का?

होय, सोनं दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. गेल्या काही वर्षांतील परतावा हेच सिद्ध करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, बोगद्यामध्ये ७-८ वाहनांची एकमेकांना जोरदार धडक

Saiyaara Vs Ye re ye re paisa 3: 'सैयारा'मुळे मराठी चित्रपटाला शोच मिळेना; मनसे नेत्यानं दिला कडक इशारा

Politics : चिराग भडकले, नितीश कुमार सरकारवर तुटून पडले; निवडणुकीआधीच बिहारचं राजकारण तापलं

Heart Attack Tips : सतर्क राहा! हार्ट अटॅक आल्यावर घरात एकटे असताना काय करावं, हे जाणून घ्या

Maharashtra Live News Update: बीडमध्ये वाल्मीक कराडचे बॅनर, बॅनर लावणारे अजित पवारांच्या जवळचे

SCROLL FOR NEXT