Dhanshri Shintre
वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक कोपरा सकारात्मक ऊर्जा देतो, त्यामुळे घर आपल्यासाठी महत्त्वाचे आणि शक्तिदायक स्थान मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक कोपरा सकारात्मक ऊर्जा देतो, त्यामुळे घर आपल्यासाठी महत्त्वाचे आणि शक्तिदायक स्थान मानले जाते.
घर रंगवताना या गोष्टी दुर्लक्षित केल्यास नकारात्मक ऊर्जा घरात येऊ शकते आणि परिणाम दिसू लागतात.
वास्तुशास्त्रानुसार भिंतींचे रंग केवळ देखणेपणासाठी नसून, ते ऊर्जा, संपत्ती आणि मानसिक आरोग्यावरही प्रभाव टाकतात.
वास्तुशास्त्रानुसार काळा रंग अशुभ मानला जातो कारण तो नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो, ज्यामुळे तणाव, नैराश्य आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात.
गडद तपकिरी रंग स्थिरतेचे प्रतीक असला तरी भिंतींसाठी वापरल्यास तो मानसिक थकवा वाढवतो आणि आळशीपणा जाणवण्याची शक्यता अधिक असते.
संपूर्ण खोली राखाडी रंगाने रंगवल्यास मानसिक स्थितीवर परिणाम होतो, नैराश्य, एकाकीपणा आणि आर्थिक अडचणी वाढण्याची शक्यता अधिक असते.
लाल रंग ऊर्जा देणारा असला तरी तो मंगळाशी संबंधित आहे, त्यामुळे घरात राग, तणाव आणि मानसिक अशांती वाढू शकते.
निळा रंग शांततेचे प्रतीक असला तरी, वास्तुशास्त्रानुसार भिंतींवर वापरल्यास तो मनावर ताण आणतो आणि उत्साह व एकाग्रता कमी करतो.