Vastu Tips: चांदीचा मोर घरात ठेवला तर नशिबात येईल मोठा बदल, जाणून घ्या योग्य दिशा

Dhanshri Shintre

मुख्य दरवाजाजवळ ठेवणे

घराच्या मुख्य दरवाजाजवळ चांदीचा मोर ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आणि नकारात्मक शक्ती दूर राहतात.

पूजाघरात स्थापना करणे

पूजास्थळी चांदीचा मोर ठेवल्यास देवी लक्ष्मी आणि विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. हे धनवृद्धी आणि शांततेसाठी शुभ मानले जाते.

उत्तर-पूर्व दिशेला ठेवा

चांदीचा मोर उत्तर-पूर्व दिशेला ठेवल्यास घरात समृद्धी, ज्ञान आणि सकारात्मक विचारांचा वास होतो.

ड्रॉइंग रूममध्ये

घराच्या बैठक खोलीत मोर ठेवल्यास नजरेला आनंददायी दृश्य मिळते आणि सौंदर्यात भर पडते.

कपाटात ठेवू नये

चांदीचा मोर कपाटात किंवा बंद जागेत ठेवणे टाळावे. यामुळे त्याचे शुभ फळ मिळत नाही.

स्वच्छतेची काळजी घ्या

चांदीचा मोर नेहमी स्वच्छ ठेवा. धूळ किंवा घाण झाल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

पाण्याने स्वच्छ करा

आठवड्यातून एकदा मोर पाण्याने धुतल्यास त्याची ऊर्जा टिकून राहते आणि सौभाग्य वाढते.

दिवा लावा

सकाळ-संध्याकाळ त्याच्यासमोर दिवा लावा लावल्यास घरात शांती आणि प्रसन्नता नांदते.

NEXT: सतत आजारी पडता का? जाणून घ्या घरातील वास्तु दोष आणि त्यावरील सोपे उपाय

येथे क्लिक करा