Vastu Tips: सतत आजारी पडता का? जाणून घ्या घरातील वास्तु दोष आणि त्यावरील सोपे उपाय

Dhanshri Shintre

कोपऱ्याची स्वच्छता ठेवा

ईशान्य दिशा आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या कोपऱ्यात कचरा, अडगळ, किंवा भारी वस्तू ठेवू नका.

तुळशीचे रोप

तुळशीला औषधी गुणधर्म असण्यासोबतच ती सकारात्मक उर्जा देणारी वनस्पती मानली जाते. दररोज तुळशीला पाणी घालणे व आरती करणे आरोग्यदायी ठरते.

कोपऱ्यात मोकळेपणा ठेवा

या दिशेत गरजेपेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक वस्तू, डस्टबिन किंवा खराब वस्तू ठेवल्यास आरोग्यावर परिणाम होतो. येथे हलकी आणि स्वच्छ व्यवस्था ठेवा.

आरोग्याशी संबंधित देवतेची मूर्ती

घरात धन्वंतरि, शिव किंवा हनुमान यांच्या प्रतिमेची स्थापना करा. यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते.

हवा खेळती ठेवा

रुग्णाच्या खोलीत नैसर्गिक प्रकाश आणि शुद्ध हवा जाणे गरजेचे आहे. बंद खोलीत नकारात्मक ऊर्जा साचते.

आरशांची योग्य मांडणी

आरसे बेडच्या समोर नसावेत. असे केल्यास शरीरावर थकवा येतो आणि मानसिक अशांती वाढते.

बेडखाली अडगळ ठेऊ नका

बेडखाली साठवलेल्या वस्तूंमुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते, जी आरोग्यावर परिणाम करते. शक्य असल्यास त्या वस्तू बाहेर काढा.

घंटेचा आवाज

सकाळी किंवा संध्याकाळी घंटा वाजविल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आजारांची छाया दूर राहते.

NEXT: पिंपळाचे झाड तोडले का जात नाही? जाणून घ्या त्याचं महत्त्व


येथे क्लिक करा