Gold Silver Price Today (17th October) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price Today (17th October): सराफ बाजारात सोन्याला उसळी, दसऱ्याआधीच सोनं ६० हजारांवर; दिवाळीत आणखी महागणार

Gold Price Hike : वाढत्या तणावामुळे घरगुती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

कोमल दामुद्रे

Why Gold Price Increasing In India :

पितृपक्षात सोन्याच्या भाव हा गडगडला होता. मागील दोन महिन्यापूर्वी सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली. इस्त्राइल- हमास युद्धाचा परिणाम काही प्रमाणात सोन्या-चांदीवर दिसून येत आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीचे भाव कोसळले होते. अशातच युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीवर झाल्यामुळे भाव झपाट्याने वाढले. आखाती देशातील वाढत्या तणावामुळे घरगुती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

काल सोन्याच्या दरात किचिंत घसरण झालेली पाहायला मिळाली. परंतु आज सोन्याच्या भाव वाढला आहे. सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव वाढल्याने ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे. तज्ज्ञांच्या मते इस्राइल-हमास युद्धामुळे सोन्याच्या दारात आखणी वाढ होण्याची शक्यता आहे.

आज सोन्याच्या भाव ६० हजारांवर पोहोचला असून दसऱ्यापूर्वीचं (Dussehra) सोनं अधिक महाग होण्याची शक्यता आहे. अशातच सोन्याच्या (Gold) भाव हा दिवाळीपर्यंत आणखी वाढू शकतो. सणासुदीच्या (Festival) काळात वाढत्या भावामुळे दुकानदारदेखील त्रस्त आहेत. एक्सपर्ट्सच्या मते, सोन्याच्या भावात येत्या काही दिवसात २५०० ते ३००० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पितृपक्षात सोन्याचा भाव ५७ हजारांवर आला होता अशातच सोन्याचे दर पुन्हा ६० हजारांवर आले आहेत. दिवाळीपर्यंत हे दर कायम राहू शकतात किंवा आणखी वाढू शकतात. गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्सनुसार २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६०,२५० रुपये आज मोजावे लागणार आहे. तर चांदी 71,135 रुपये प्रति किलो झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

SCROLL FOR NEXT