Gold Rate In last 1 Year Saam Tv
बिझनेस

Gold Rate In last 1 Year: वर्षभरात सोन्याचे दर ५५००० रुपयांनी वाढले? दरवाढीची ५ कारणे; खरेदीआधी आताच वाचा

Gold Rate In last 1 Year Hike Reasons: सोन्याचे दर मागच्या वर्षभरापासून खूप जास्त वाढले आहे. सोन्याचे दर ५५ टक्क्यांनी वाढले आहेत. दरम्यान, सोन्याचे दर वाढण्यामागची कारणे काय जाणून घ्या.

Siddhi Hande

सोनं खरेदी करणे ही परंपरा आहे. प्रत्येक सणासुदीला घराघरात सोने खरेदी केले जाते. सोनं खरेदी करणे ही जशी परंपरा आहे तशी एक गुंतवणूकदेखील आहे. प्रत्येक स्त्रीला सोन्याचे दागिने खूप आवडतात. लग्नकार्यात सोन्याचे दागिने घेतले जातात. त्यामागे काही कारणे असतात. सोने ही एक गुंतवणूक असते. तुम्हाला या सोन्याचा भविष्यात फायदा होतो. कारण गेल्या अनेक वर्षांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढत आहे. मागच्या वर्षभरात हे दर जवळपास ५० ते ५५ टक्क्यांनी वाढले आहेत.

सोन्याचे दर मागच्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ५० ते ५५ हजारांनी वाढले आहेत. त्यामुळे सोन्याचे दर वाढतच आहेत. याचा फायदाच होणार आहे. दरम्यान, हे दर अजून वाढण्याची शक्यता आहेत. सोन्याचे दर मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी एवढे का वाढले त्याची कारणे समोर आली आहेत. (Gold Rate Hike Reasons)

1. सोन्याचे वित्तीयकरण

सोने खरेदी करणे हे आता फक्त लग्नसमारंभ किंवा सणासुदीच्या काळापुरतं मर्यादीत राहिलेलं नाही. सोन्याचे बाजारपेठ ही वैयक्तिक मालमत्ता, फॅशन किंवा जीवनशैलीची निवड राहिलेली नाही. हा बाजार आता १०० ते ५०० पट मोठा झाला आहे. आता मध्यवर्ती बँकांच्या ट्रेझरीने हेज फंड यासाठी जोखीम कमी करण्यासाठी विविध मालमत्ता यांनी वित्ती मालमत्ता म्हणून सोने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. किरकोळ बाजारातही ईटीएफद्वारे सोन्याचे वित्तीयकरण केले जात आहे.

2. मध्यवर्ती बँकांचा दृष्टीकोन

बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर गॉर्डन यांनी १९९९ मध्ये ४१५ टन सोने विकण्याचा निर्णय घेतला. हे त्यांना डेड असेट वाटत होते. त्यांना वाटत होते की हे सोने चलनात रुपांतरित करुन त्यातून नवा व्यवसाय सुरु करावा, यामुळे सोन्याचा दर खूप घसरला होता.परंतु आजच्या मध्यवर्ती बँकांचा दृष्टीकोन उलट आहे. सोने ही एक महत्त्वाचा मालमत्ता वाटत आहे. यामुळे देशातील मध्यवर्ती बँकांनी सोने खरेदीवर भर दिला आहे.

3. डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरण

जागतिक बाजारातील अस्थिरता हे सोन्याच्या दरवाढीमागचे मुख्य कारण आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यात अजून भर घातली आहे. त्यांनी आयातशुल्क म्हणजेच टॅरिफ वाढवल्यामुळे त्याचा परिणाम थेट सोन्याच्या भावावर झाला आहे. आयातशुल्क म्हणजे इतर देशाने सीमाशुल्क वाढवणे.

4. डॉलरचाही परिणाम

भारताबाबत जे धोरण वापरले आहे ते इतर देशांबाबतही लागू होऊ शकते. यामुळे निर्यातीवर परिणाम होईल. रशियावरील निर्बंध पाहून पोलंड, भारत आणि इतर देशाने सोने खरेदीवर भर दिली आहे. याचसोबत डॉलरची किंमतदेखील वाढत आहे. यामुळे महागाई, डॉलरचा पुरवठा हेदेखील सोन्याच्या दरवाढीमागचे कारण आहे.

5. महागाई आणि वाढती मागणी

सोन्याचे दर जरी वाढत असले तरीही त्याची मागणी काही कमी होत नाहीये. सोने ही एक गुंतवणूक समजून अनेकजण सोने खरेदी करताना दिसत आहे. याचसोबत जीएसटी, मेकिंग चार्जेस यामुळे सोन्याचे दर वाढत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hand Trembling: हाथ थरथरणे 'हे' कोणत्या आजाराचे लक्षण आहे? अशी घ्या काळजी

Ginger garlic paste: 'या' पदार्थांमध्ये फोडणीमध्ये चुकूनही आलं-लसूण पेस्ट वापरू नका

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात; ४८०कोटी रुपये वाटपास मंजुरी, कोणत्या जिल्ह्यांना मिळेल मदत

Thurday Horoscope : हितशत्रूंचा त्रास संभवतोय, अडचणी मागे लागतील; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात साडेसातीचे संकेत

Ratnagiri Tourism: रत्नागिरीपासून ४० किमी अंतरावर आहे सुंदर मंदिर; ८०० वर्ष जुन्या या मंदिराला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT