Gold Price Fall Saam TV
बिझनेस

Gold Price Today : आनंदवार्ता! सोन्याच्या दरात घसरण, मुंबईत ५ हजार, पुण्यात ३ हजारांनी स्वस्त; तुमच्या शहरातील भाव काय? पाहा व्हिडिओ

Vishal Gangurde

मुंबई : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर देशभरात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मुंबईत सोनं ५ हजारांनी स्वस्त झालं आहे. तर पुण्यात ३ हजारांनी स्वस्त झालं आहे. तर जळगावात २ हजारांनी घट झाली आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात आयात शुल्क कमी करताच सोन्याच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर राज्यभरातील विविध शहरात सोनं स्वस्त झालं आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाने सोन्याच्या दरात कमालीची घट झाली आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहक आनंदी झाले आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात आयात शुल्क १५ टक्क्यांवरून थेट ६ टक्के इतकं केलं आहे. त्यामुळे राज्यभरातील प्रत्येक शहरातील सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मुंबईतील बाजारात सोन्याच्या दरात ५ हजारांनी स्वस्त झाली आहे. जळगावच्या बाजारात सोने ७३ हजार ३०० वरून ७० हजार ५०० रुपये झालं आहे. सोन्याचे भाव कमी झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे.

सोन्याचे दरात घसरण झाल्यामुळे आम्ही जादा सोने खरेदी करू शकतो, अशा भावना ग्राहकांनी व्यक्त केल्या आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या आणि चांदीच्या भावात घट झाल्यानंतर मार्केटमध्ये खरेदीदारांची संख्या वाढणार आहे, अशी श्क्यता सोन्या-चांदीचे व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली आहे.

सोन्याचे भाव (पुणे)

आधीचे: 72,500 रुपये

आताचे : 69,500 रुपये

चांदीचे भाव (पुणे)

आधीचे: 89,600

आताचे: 85,600

कोल्हापूर

सोन्याचे दर

आज - 24 कॅरेटचा दर 71,200 रुपये

कालचा दर - 24 कॅरेटचा दर 73,500 रुपये

जळगाव

सोने - 70 हजार 700

GST नुसार - 73 हजार 800

चांदी - 87 हजार

चांदी- 89 हजार 600

बुलढाणा

सोने - काल - 73000 प्रति 10 ग्रॅम.

- आज - 68000 प्रति 10 ग्रॅम.

चांदी - काल - 91650 प्रति किलो.

- आज - 84330 प्रति किलो.

सातारा

सोमवारी २४ कॅरेट - 73250/- प्रति तोळा

मंगळवारी २४ कॅरेट - 71200/- प्रति तोळा .

कालचा चांदीचा दर 90,000 ते 91000/- प्रति किलो होता.

आजचा चांदीचा दर 88500/-

लातूर सोने- चांदी दर...

सोने-----

24 कॅरेट : 75,100(प्रति 10ग्रॅम)

22 कॅरेट : 72,900(प्रति 10ग्रॅम)

------

चांदी

91,500 (प्रति किलो)

23/07/2024

-----

सोने-

24 कॅरेट ::- 75000(प्रति 10ग्रॅम)

22 कॅरेट::- 72,800(प्रति 10ग्रॅम)

चांदी-------

90,600 (प्रति किलो)

-------

सांगली - सोने- चांदी दर

22/07/2024

सोने-

24 कॅरेट - 73,500

22 कॅरेट - 68,300

23/07/2024

सोने-

24 कॅरेट - 71,200

22 कॅरेट - 66,200

--------

सिंधुदुर्ग

कालचा सोन्याचा दर-

24 कॅरेट- 72140

आजचा सोन्याचा दर -

24 कॅरेट- 70860

--------

कालचा दर-

22 कॅरेट सोन्याचा दर- 66230

आजचा सोन्याचा दर -

22 कॅरेट- 64950

--------

चांदी कालचा दर- 96000

आजचा चांदीचा दर- 95600

नाशिक -

कालचा सोन्याचा दर - 73 हजार 100 रुपये

आजचा सोन्याचा दर - 70 हजार 100 रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

SCROLL FOR NEXT