Gold Silver News Saam TV
बिझनेस

Gold Silver News : सोन्यासह चांदीच्या दरांत मोठी उसळी; वाचा तुमच्या शहरातील भाव किती वाढला?

Gold Silver Hike : मुंबई-पुण्यासह विविध शहरांत सोने-चांदीच्या किंमतीचा भडका उडला आहे. सोन्याच्या दरांनी मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे सामान्य नागरीकांना सोनं खरेदी करताना आता चांगलीच कसरत करावी लागणारे.

Ruchika Jadhav

एप्रिलपासून सोने-चांदीचे भाव वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर मात्र हे भाव काहीसे कमी-कमी होत गेले. सीमा शुल्क कपातीची घोषणा झाल्यानंतर पुन्हा भाव कमी झाले. मात्र अमेरिकन बँकांची स्थिती बिकट होत असताना ऑगस्ट महिन्यापासून सोने-चांदीचे भाव पुन्हा एकदा वाढू लागले. गेल्या आठवड्यात ७३ हजारांच्या आत असलेल्या सोन्याचे भाव गुरुवारी ७४ हजार ३०० रुपयांवर पोहोचले. शुक्रवारी ३०० शनिवारी ५०० रुपये असे दोन दिवसात ८०० रुपयांची वाढ होऊन सोने ७६ हजार ०८० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. जागतिक पातळीवर सोने खरेदीकडे कल वाढल्याने भाव दरात चढ होत असल्याचा हा परिणाम असल्याचे सुवर्ण व्यावसायिक सांगत आहेत.

आजचा २२ कॅरेटचा भाव

१०० ग्रॅम सोन्याचा भाव - ६, ९७, ५०० रुपये

१० ग्रॅम सोन्याचा भाव - ६९,७५० रुपये

८ ग्रॅम सोन्याचा भाव - ५५,८०० रुपये

१ ग्रॅम सोन्याचा भाव - ६,९७५ रुपये

२४ कॅरेट सोन्याचा भाव

१०० ग्रॅम सोन्याचा भाव - ७,६०,८०० रुपये

१० ग्रॅम सोन्याचा भाव - ७६,०८० रुपये

८ ग्रॅम सोन्याचा भाव - ६०,८६४ रुपये

१ ग्रॅम सोन्याचा भाव - ७,६०८ रुपये

विविध शहरांतील सोन्याचा भाव

जळगावात सोन्याच्या भावात वाढ होऊन ते ७५ हजारावर प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. सोने पुन्हा एकदा उच्चांकी भावावर पोहोचले आहे.

मुंबईमध्ये १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,९६० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव आज ७,५९३ रुपये आहे. पुण्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,९६० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,५९३ रुपये इतका आहे. नागपूर आणि नाशिकमध्ये देखील सोन्याचा भाव हाच आहे.

चांदीच्या ताज्या किंमती काय?

आज चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. गुडरिटर्नसवर आलेल्या माहितीनुसार, चांदी प्रति किलो ९३,००० रुपये इतकी झाली आहे. राज्यातील विविध शहरांत चांदी याच किंमतीने विकली जात आहे.

दिवाळीमध्ये भाव आणखी वाढणार?

सोन्याचा वाढता दर पाहून दिवळी आणि पुढे लग्नसराईमध्ये देखील भाव आणखी वाढणाक का? अशी चिंता सामान्य नागरिकांच्या मनात येत आहे. सीमा शुल्क कपातीची घोषणा होण्याआधी सोन्याचा भाव लाख रुपये प्रति तोळा होण्याची चर्चा होती. त्यामुळे खरोखर सोन्याचा भाव इतका वाढणार की कमी होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो eKYC झाली का? फक्त १२ दिवसांचा वेळ, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Accidents : पुण्यात भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, जालना अन् बुलडाण्यात भयंकर दुर्घटना, राज्यात ७ जण ठार

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाथर्डी मध्ये दाखल

Malti Chahar: बापाच्या वयाच्या डायरेक्टरने किस केला, मालती चहरचा धक्कादायक आरोप; बिग बॉस फेमसोबत नेमकं काय घडलं?

फास्ट फूड अन् ऑनलाइन जेवणामुळे कॅन्सर, डॉक्टरांनी सांगितला नेमका धोका, वाचा काय म्हणाले तज्ज्ञ

SCROLL FOR NEXT