Gold Loan Saam Tv
बिझनेस

Gold Loan: १ तोळा सोन्यावर किती कर्ज मिळते? EMI किती भरावा लागणार? वाचा सविस्तर

How to Get Gold Loan Interest and EMI: सध्या सोन्याचे दर वाढत आहे. सोन्याचे भाव वाढत असल्याने तुम्ही त्यावर कर्ज घेऊ शकतात. हे कर्ज वैयक्तिक कर्जापेक्षा अधिक फायदेशीर आहे. यावर कमी व्याजदर भरावे लागते.

Siddhi Hande

वैयक्तिक कर्जापेक्षा गोल्ड लोन फायदेशीर

कमी व्याज भरावे लागणार

१ तोळा सोन्यावर कर्ज मिळते का?

किती रुपयांचा EMI भरावा लागणार?

सध्या सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. सोन्याचे दर वाढत जात असल्याने खरेदीदारांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. याउलट अनेकजण सोनं विकत आहेत. दरम्यान, तुम्ही सोन्यावर कर्जदेखील घेऊ शकतात. सध्याच्या काळात महागाई खूप वाढत आहे. त्यामुळे अनेक गोष्टींसाठी कर्ज घ्यावे लागते. मात्र, कर्ज घेताना सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्याकडे असलेल्या सोन्यावर कर्ज घेऊ शकतात.

सोने ही एक गुंतवणूक असते. तुम्ही अडचणीच्या काळात सोनं विकू शकतात. दरम्यान, सोन्यावर तुम्ही कर्ज घेऊ शकतात. यामुळे तुम्हाला अडचणीच्या काळात आधार मिळतो.

१ तोळ्याच्या सोन्यावर तुम्हाला कर्ज मिळते का असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. दरम्यान यावर किती टक्के व्याज लागले आणि ईएमआय किती भरावा लागतो, असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाले आहेत. दरम्यान, आता रिझर्व्ह बँकेने याबाबत नियम स्पष्ट केले आहेत.

सोन्यावर किती रुपयांचे कर्ज मिळते?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सोन्याच्या मूल्याच्या ठरावीक रक्कमेपर्यंत कर्ज देतात. सध्या लहान कर्जांसाठी ८५ टक्के, २.५ ते ५ लाखांपर्यंत ८०टक्के आणि त्यापेक्षा जास्त रक्कमेसाठी ७५ टक्के कर्ज मिळू शकते. दरम्यान सोन्याचे मूल्य जेवढे जास्त तितके जास्त कर्ज मिळण्याची शक्यता असते.

कर्जाची रक्कम कशी ठरवतात?

सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर १ तोळ्यामागे १,४७,७०० रुपयांपर्यंत आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १,५१,००० ते १,५६,००० रुपये आहेत. बँका पहिल्यांदा सोन्याचे वजन आणि शुद्धता तपासतात. त्यानंतर त्यात मणी वैगेरे असेल तर त्याचे वजन कमी करतात. फक्त सोन्यावरच कर्ज दिले जाते.

जर २२ कॅरेट सोन्याचे दर १.४० लाख आहे तर तुम्हाला ८५ टक्क्यापर्यंत कर्ज मिळू शकते. म्हणजेच १,१९,००० रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. तुम्हाला १,०५,००० ते १,१२,००० रुपयांपर्यंत कर्ज मिळते.

व्याजदर (Gold Loan Interest Rate)

गोल्ड लोनवर सर्वाधिक कमी व्याजदर आकारले जाते. पर्सन लोनच्या तुलनेत हे व्याजदर कमी आहे. स्टेट बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआयमध्ये व्याजदर ८.५ ते १२ टक्के व्याज लागू होते. दरम्यान, यासाठी तुम्ही दर महिन्याला ईएमआयदेखील भरु शकतात.

ईएमआय किती भरावा लागणार? (Gold Loan EMI Calculation)

जर तुम्हाला १ लाखांचे कर्ज दिले. त्यावर १ वर्षासाठी १० टक्के व्याजदर लावले तर महिन्याला ८,८०० ते ९००० रुपये ईएमआय भरावा लागेल. दरम्यान, गोल्ड लोन घेताना कोणत्याही प्रकारच्या क्रेडिट स्कोअरची चिंता नसते. त्यामुळे इतर कर्जापेक्षा गोल्ड लोनवर कमी व्याजदर आकारले जाते.

टीप- सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. जर गुंतवणूक करायची असेल तर तज्ज्ञांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेगटातून बड्या नेत्याची हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ

Shocking : लॉजवर बंद खोलीत आढळला बडतर्फ पोलिसाचा मृतदेह; पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

Maharashtra Live News Update: अनधिकृत बांधकामांवर बदलापूर नगरपालिकेची धडक कारवाई

Home Remedies For Glowing Skin: ग्लोईंग स्किनसाठी त्वचेवर लावा या 5 गोष्टी, चेहरा होईल गोरापान

Ajit Pawar Death: १०० टक्के अजितदादांचा घात झालाय, अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT