जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. गेल्या काही दिवसांपासून भारतात सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. एप्रिलमध्ये १० ग्रॅम सोन्याने ₹१,००,००० चा टप्पा पार केला होता. त्यानंतर ग्राहकांनी सराफ बाजाराकडे पाठ फिरवली. मात्र, आता पुन्हा एकदा सोनं ₹८८,००० पर्यंत स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
२२ एप्रिल रोजी MCX वर सोनं प्रति १० ग्रॅम ₹९९,३५८ च्या उच्चांकी दरावर पोहोचलं होतं, परंतु आता या किंमतीत सुमारे ७% घट झाली आहे.
आज १८ मे महाराष्ट्रात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ९६,१७५ इतका आहे. तर, २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ८८,१६० रूपये इतका आहे. तर, १ ग्रॅम सोन्यासाठी आपल्याला ९,६१७ रूपये मोजावे लागतील. सोन्याचे हे दर आणखी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सोन्याच्या दरात घट होण्यामागचं कारण काय?
ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने असा दावा केला आहे की, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता कमी झाली आहे, ज्यामुळे सुरक्षित गुंतवणूक असलेल्या सोन्यावर मागणी कमी झाली. १२ मे रोजी युद्धबंदी झाल्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीकडून मागे हटण्याचा ट्रेंड दिसून येत आहे.
यासह टॅरिफ करारामुळे जागतिक व्यापार सुरळीत झाल्याने सोन्यावरचा दबाव वाढला आहे.गुंतवणूकदारांनी उच्च किमतीवर नफा मिळवून शेअर बाजाराकडे वळण्यास सुरुवात केली आहे.
सोने आणखी स्वस्त होईल?
इकॉनॉमिक टाईम्सने बाजार विश्लेषकांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, सोनं लवकरच ₹८७,०००, ₹८८,००० प्रति १० ग्रॅम पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
हा काळ दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम संधी ठरू शकते, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
कितीपर्यंत घसरू शकतं सोने?
तज्ज्ञांच्या मते, लवकरच सोन्याच्या किमती $3,000 - $3,050 (म्हणजेच ₹८७,००० – ₹८८,००० प्रति १० ग्रॅम) पर्यंत घसरू शकतात. ही घसरण काही गुंतवणूकदारांसाठी खरेदीची संधी ठरू शकते, विशेषतः जे दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.