Gold Rate SaamTv
बिझनेस

Gold Rate: चांदीला आज चकाकी, सोन्याच्या दरात वाढ झाली की घसरण? जाणून घ्या आजचे दर

Gold and Silver Rates: ५ जून रोजी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत थोडी वाढ झाली आहे. विशेषतः, २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याचा दर फक्त १० रुपयांनी वाढलेला दिसून येत आहे.

Bhagyashree Kamble

सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. मात्र गुरुवारी, ५ जून रोजी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत थोडी वाढ झाली आहे. विशेषतः, २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याचा दर फक्त १० रुपयांनी वाढलेला दिसून येत आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ९९,९०० रूपये आहे. आजचा सोने - चांदीचा भाव किती आहे, जाणून घेऊयात.

गुरूवारी ५ जून रोजी सोन्याच्या किमतीत थोडीशी वाढ झाली आहे. दिल्लीत कालच्या तुलनेत २२ आणि २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली असल्याचं दिसून आलं आहे. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ९१,०६० रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ९९,३३० प्रति १० ग्रॅम आहे. मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर ९०,९१० रूपये इतका आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ९९,१८० प्रति ग्रॅम आहे.

आजचा चांदीचा दर

चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे. गुरूवार ५ जून रोजी चांदीचा भाव १,०२,१०० रूपये प्रति किलो आहे. आज चांदीचा भाव कालच्या तुलनेत १०० रूपयांनी वाढला आहे. ४ जून रोजी एक किलो चांदीचा दर १,०२,००० रूपये होता.

सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?

२४ कॅरेट सोनं हे शुद्ध असते. तर, २२ कॅरेट सोन्याचा वापर सोन्याचे दागिने करण्यासाठी वापरण्यात येते. भारतातील सोन्याच्या किमती आतंरराष्ट्रीय बाजारातील किमती, सरकारकडून लादलेले कर, रूपयाच्या मूल्यातील बदल यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते. सोने ही केवळ गुंतवणूक नाही तर, ती आपली परंपरा आणि सणांचा एक भाग आहे. विशेषत: लग्न आणि सणांच्या वेळी सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

Thane Navratri: ठाण्यातील गरबाचे प्रसिद्ध ठिकाण; पाहा जत्रेचं अप्रतिम दृश्य

SCROLL FOR NEXT