सोनं आणि चांदी झाली स्वस्त, सुवर्णनगरीत भाव काय? saam tv
बिझनेस

Gold : सोनं-चांदी खरेदीदारांसाठी खूशखबर! चांदी ८००० ने स्वस्त, सोन्याची किंमतही घसरली; पाहा आजचे दर

Gold rate today : जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीचा भाव प्रतिकिलो ८ हजार रुपयांनी कमी होऊन २ लाख १० हजार रुपयांवर आला, तर सोन्याचा दर ५०० रुपयांनी घसरला. जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर.

Namdeo Kumbhar

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Gold and Silver Prices Decline in Jalgaon : जळगावमध्ये चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मागील आठवडाभरापासून सोने व चांदीचे भाव सातत्याने कमी होत असून, आज चांदीच्या भावात तब्बल ८ हजार रुपयांची मोठी घट झाली आहे. यामुळे या वर्षातील चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत.

बुधवारी (ता. १४) सोन्याचा भाव १ लाख ४८ हजार ५०० रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होता. आज सुवर्ण बाजार उघडल्यानंतर सकाळी सोन्याचे भाव ५०० रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदीच्या भावात मागील दोन दिवसांत मोठी घसरण नोंदवली गेली आहे. कालच्या तुलनेत आज चांदी थेट ८ हजार रुपयांनी खाली आली आहे.

बुधवारी (ता. १४) २ लाख १८ हजार रुपये (प्रतिकिलो विनाजीएसटी) असलेली चांदी, आज घसरून २ लाख १० हजार रुपयांवर आली आहे. सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीचे भाव कमी झाल्यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. पितृपक्ष नुकताच संपला असून आता नवरात्रोत्‍सव सुरू आहे.

दरम्‍यान सुवर्ण बाजारात मागील काही दिवसांपासून सातत्‍याने घसरण होत असल्‍याचे चित्र आहे. मध्‍यंतरी भाव काहीसे वाढले होते. परंतु, पितृपक्षात होत मागणी कमी असल्‍याने पितृपक्ष पंधरवड्यात सोने व चांदीचे भाव कमी होत आले आहेत.

मागील काही दिवसांतील सोन्या-चांदीचे भाव

१० ऑक्टोबर -

सोनं १ लाख ४९ हजार ८००

चांदी प्रतिकिलो (विनाजीएसटी) २ लाख २५ हजार

११ ऑक्टोबर -

सोनं १ लाख ४९ हजार ८००

चांदी २ लाख २५ हजार

१२ ऑक्टोबर -

सोनं १ लाख ४८ हजार ५००

चांदी २ लाख २५ हजार

१३ ऑक्टोबर.

सोनं १ लाख ४८ हजार.

चांदी २ लाख २४ हजार

१४ ऑक्टोबर

सोनं १ लाख ४६ हजार ५००

चांदी २ लाख १८ हजार

Knee Damage : गुडघे कमजोर करत आहेत रोजच्या 'या' ५ सवयी; वेळीच ओळखा धोका, नाहीतर...

7 Types Of Veg Rice: रोजचा साधा भात खाऊन कंटाळा आलाय? ट्राय करा सोप्या आणि चवदार 7 व्हेज राईस रेसिपीज

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

Restaurant Price Hike : खवय्यांच्या खिशाला बसणार फटका! हॉटेल - रेस्टॉरंटमधील जेवण महागणार; किती पैसे मोजावे लागणार? वाचा

Supreme Court : मोठी बातमी! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, राहुल गांधींनाही फटकारले

SCROLL FOR NEXT