Gold Rate Today: सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १ तोळ्यासाठी किती रुपये द्यावे लागणार; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Gold Silver Price Down: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. सोनं-चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. १० तोळा सोनं ८२०० रुपयांनी स्वस्त झालं आहे.
Gold Rate Today: सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १ तोळ्यासाठी किती रुपये द्यावे लागणार; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर
Gold Silver Price Hikemeta ai
Published On: 
  • आज २४-२२ आणि १८ कॅरेट सोन्याचा दरात मोठी घसरण

  • २४ कॅरेटचे १० तोळा सोनं ८२०० रुपयांनी स्वस्त

  • २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ७,५०० रुपयांची घसरण

  • १ किली चांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली

सोनं-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला. दर कमी झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बुधवारी १० तोळा सोनं १०,००० रुपयांनी स्वस्त झालं होतं. आज २४ कॅरेटचे १० तोळा सोनं ८२०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे त्यामुळे आज खरेदीची सुवर्णसंधी आहे. तर आज चांदीचे दर देखील घसरले आहेत. १ किलो चांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली. आज खरेदी करायला जाण्यापूर्वी सोनं आणि चांदीचे दर किती ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, २४, २२ आणि १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ८२० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,४७,४४० रुपये खर्च करावे लागतील. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ८,२०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १४,७४,४०० रुपये खर्च करावे लागतील. सोन्यात जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही २४ कॅरेटचे सोनं खरेदी करू शकता.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १ तोळ्यासाठी किती रुपये द्यावे लागणार; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर
Gold Rate Today: नवरात्रीत सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा सोनं 3,900 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ७५० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,३५,१५० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ७,५०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १३,५१,५०० रुपये द्यावे लागतील. सोन्याचे दागिने २२ कॅरेटचे बनवले जातात त्यामुळे आज तुम्ही २२ कॅरेटचे सोन्याचे दागिने खरेदी करू शकता.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १ तोळ्यासाठी किती रुपये द्यावे लागणार; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर
Gold Rate : सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १० तोळं सोनं ₹१०,३०० नी स्वस्त, तुमच्या शहरातील ताजे दर जाणून घ्या

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटचे सोनं देखील स्वस्त झालं आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ६१० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,१०,५८० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटचे १० तोळा सोनं ६,१०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना ११,०५,८०० रुपये खर्च करावे लागतील.

सोन्यासोबत आज चांदी देखील स्वस्त झाली आहे. आज १ ग्रॅम चांदी ५ रुपयांनी स्वस्त झाली. १ ग्रॅम चांदी २३० रुपयांनी विकली जात आहे. तर आज १ किलो चांदीच्या दरामध्ये ५००० रुपयांची घसरण झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी ग्राहकांना २,३०,००० रुपये खर्च करावे लागतील. आज तुम्हाला सोन्यासोबत चांदी देखील स्वस्तात खरेदी करता येणार आहे.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १ तोळ्यासाठी किती रुपये द्यावे लागणार; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर
Gold Rate : नवरात्रोत्सवात सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! सुवर्णनगरीतील मागील ५ दिवसातील दर पाहाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com