Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

सुवर्णनगरीत सोन्याचे दर घसरले; दिवाळी पाडव्याला जोडीदारासाठी घ्या गिफ्ट ; पाहा आजचा लेटेस्ट भाव

Price Decline in Gold and Silver on Padwa: दिवाळी पाडव्यानिमित्त सोन्याच्या दरात कमालीची घट. सोन्याचा भाव ६,२०० रुपये प्रति तोळा घटला, चांदीच्या दरात ५,००० रुपये घट.

Bhagyashree Kamble

  • दिवाळी पाडव्यानिमित्त सोनं - चांदीच्या दरात मोठी घसरण.

  • ग्राहकांची सोनं खरेदीसाठी गर्दी.

  • सोन्याच्या भावात ६,२०० रूपयांची घट.

गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सतत बदल होत आहे. धनत्रयोदशीला सोन्याच्या दरात कमालीची घट झाली होती. आजही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या १२ तासांत सोन्याच्या भावात ६,२०० रूपयांनी घसरण झाली आहे. तर, चांदीच्या दरात ५ हजार रूपयांची घसरण झाली आहे.

जागतिक पातळीवर सोन्यातील आणि चांदीतील गुंतवणूक जास्त झाल्यानं प्रॉफिट बुकिंगचा परिणाम स्थानिक बाजारात दिसून आला आहे. यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसेच दिवाळी पाडव्यानिमित्त खरेदीसाठी गर्दीही वाढली आहे.

पाडव्यानिमित्त सुवर्णनगरीत अर्थात जळगावमध्ये सोन्यच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या दरात ६ हजार रूपयांची घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

१ तोळं सोन्याची किंमत (जीएसटीसह) १ लाख २८ हजार ४०० इतकी आहे. तर, तोळं सोनं (जीएसटीशिवाय) १ लाख २४ हजार ८०० रूपये इतके आहे. चांदीच्या दरात देखील कमालीची घसरण झाली आहे. प्रति किलो चांदीचा दर (जीएसटीसह) १ लाख ६४ हजार ८०० रूपये इतके आहे. तर, (जीएसटीशिवाय) चांदीचा दर १ लाख ६० हजार इतका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंढरपुरात कालव्यातील पाण्याची नासाडी

5 Potato Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी स्पेशल रेसिपी! बटाट्यापासून बनवा 5 उपवासाचे पदार्थ

Hair Fall: केसगळती आणि केस तुटण्याची समस्या होईल कमी; आठवड्यातून २ वेळा लावा हे घरी बनवा खास तेल

Navratri Fasting Recipe : नवरात्रीत उपवासाला गोड खाण्याची मजाच वेगळी, 'असा' बनवा मऊसूत रताळ्याचा शिरा

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, दिल्लीतील वातावरण तापले

SCROLL FOR NEXT