Diwali Gold Buying Alert: Gold Adulteration Exposed By Artisans saam tv
बिझनेस

दिवाळीत सोनं खरेदी करताय तर सावधान; ऐन सणासुदीत भेसळयुक्त सोन्याचा सुळसुळाट

Gold Adulteration : दिवाळीत सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? ऐन सणासुदीत सोन्यातील भेसळीचा प्रकार कारागिरांनी उघडकीस आणलाय. सोन्याचे दागिने खरेदी करताना शुद्धता आणि हॉलमार्क कसा तपासावे, जाणून घ्या.

Rohit Kadam

आता बातमी आहे सोन्यातील भेसळीची.आजवर तुम्ही अन्नपदार्थ, औषधांतील भेसळ ऐकली असेल. मात्र, आता चक्क सोन्यात भेसळ झालीये. होय, आणि ही भेसळ चक्क कारागिरांनी उघडकीस आणलीये. सोन्यातील भेसळीचा प्रकार कसा आणि कुठे उघडकीस आलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

धनत्रोयदशी - पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही जर सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर सावधान. कारण ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आता बाजारात येणारं सोनंच अशुध्द आहे आणि याची तक्रार ग्राहकांनी नव्हे तर खुद्द कारागिरांनीच केली आहे. इंदूरच्या सराफा बाजारात पावडरवाल्या सोन्याची खरेदी होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. सोने, चांदी आणि दागिने व्यापारी संघटनेकडे कारागिरांनी सोन्यातील भेसळीच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात संपूर्ण देशभरातील सराफा व्यापारी सावध झालेत. पावडर वापरून सोन्यात नेमकी कशी भेसळ केली जाते बघा.

देशात भेसळयुक्त सोन्याची खरेदी

सोन्यात रुथेनियम सारख्या जड धातूच्या भेसळीच्या तक्रारी समोर आल्यात. रुथेनियम हा धातू जड असल्यानं त्याची पावडर मिसळल्यास सोन्याचं वजन वाढतं. या पावडरची किंमत सोन्याच्या दरापेक्षा सुमारे 10% कमी असल्याची माहिती समोर आली असून भेसळयुक्त सोनं महाराष्ट्र आणि बंगालमार्गे इंदूरच्या बाजारपेठांमध्ये पोहोचत असल्याचा संशय आहे. ही भेसळ शोधण्यासाठी एक्स-रे फ्लोरेसेन्स आणि लेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेता येते.

महत्त्वाचं म्हणजे, ही भेसळ इतक्या कुशलतेने केली जाते की ती ग्राहकांना तर समजत नाहीच पण सामान्य ॲसिड चाचणीतही ओळखता येत नाही. त्यामुळे इथले व्यापारीच सोन्याच्या शुद्धतेबाबत अधिक दक्ष झाले आहेत.विशेष म्हणजे, काही सराफ भेसळयुक्त सोनं शुद्ध सोन्याच्या किमंतीतच विकत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत भेसळयुक्त सोनं बाजारात आल्यानं ग्राहकांची फसवणूक होण्याचा धोका वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची लूट; 'साम'च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये लुटीचा पर्दाफाश

Friday Horoscope: धनत्रयोदशीला ५ राशींचे नशीब चमकणार! धनलाभासह रखडलेली कामे होणार पूर्ण, वाचा राशीभविष्य

Dhanteras Wishes : आली दिवाळी! मराठी, हिंदी आणि इंग्रजीत धनतेरसचे प्रियजनांना पाठवा खास मेसेज

Dhanteras 2026 : धनतेरसला पैसे उधार दिले तर घरात येते गरिबी? काय सांगते धार्मिक मान्यता?

ZP अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; घरात सापडलं अडीच किलो सोनं, 11 किलो चांदी

SCROLL FOR NEXT