Godrej Family Business Division Yandex
बिझनेस

Godrej Family Split: १२७ वर्षे जुन्या गोदरेजमध्ये फूट; कंपनीची झाली दोन शकलं, कोण असणार उद्योगाचे नवे चेहरे?

Godrej Family Business Division: देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांमध्ये गोदरेजचा समावेश होतो. आता तब्बल १२७ वर्षांनंतर गोदरेज समुहाचे दोन भाग झाले आहेत.

Rohini Gudaghe

देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांमध्ये गोदरेजचा समावेश होतो. आता तब्बल १२७ वर्षांनंतर गोदरेज समुहाचे दोन भाग झाले आहेत. आदि गोदरेज आणि त्यांच्या भावामध्ये ठरलेल्या करारानुसार कंपन्यांची विभागणी (Godrej Family Split) झाल्याची माहिती मिळत आहे. आता या उद्योगाच्या कारभाराची कमान नव्या चेहऱ्यांच्या हाती जाणार आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेऊ या.

विभागणीनंतर गोदरेज समूहाने शेअर मार्केटला माहिती दिली आहे. त्यानुसार गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स, गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज प्रॉपर्टीज आणि लाईफ सायन्सेस यांचं विलीनीकरण करून स्थापन होणाऱ्या गोदरेज उद्योग समूहाची कमान आदि गोदरेज आणि नादिर गोदरेज यांच्याकडे असणार (Godrej Business Split) आहे.

तर अभियांत्रिकी, गृहोपयोगी वस्तू, फर्निचर, सुरक्षा उत्पादने, एरोस्पेससाठी प्रणाली, औद्योगिक लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासासारख्या विभागांमध्ये काम करणाऱ्या गोदरेज अँड बॉयसचं नेतृत्व जमशेद गोदरेज, नायरिका होळकर (Nyrika Holkar) आणि त्यांचं कुटुंब करणार आहेत. या सर्व कंपन्या गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या अंतर्गत येतात.

कंपनीचे सांगितलं आहे की, गोदरेज कुटुंबात सामंजस्याने विभाजन करण्यात आलं आहे. कुटुंबातील सदस्यांच्या भावना जपून व्यवसाय अधिक प्रभावीपणे करता येतो. त्यामुळे आगामी काळात या व्यवसायाला धोरणात्मक दिशा (Godrej Business Division) मिळेल. कंपन्यांचे त्यांच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित होईल. नवीन पिढी दीर्घकालीन योगदान देऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सध्या गोदरेज समूहाकडे पाच सूचीबद्ध कंपन्या (Godrej Family Business Division) आहेत. त्यांचं एकूण मुल्य २.३४ लाख कोटी आहे. आदि गोदरेज, नादिर गोदरेज, स्मिता कृष्णा गोदरेज, जमशेद गोदरेज आणि रिशद गोदरेज यांच्यामध्ये व्यवसाय विभागला गेला आहे. त्यांच्याकडे प्रत्येकी १५.३ टक्के व्यवसायाची हिस्सेदारी आहे. वाटणी झाली, तरी ब्रॅंड एकच असणार असल्याची माहिती टीव्ही नाईनच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

आदि गोदरेज यांचा मुलगा पिरोजशा गोदरेज आणि नायरिका होळकर हे उद्योग समूहाचा नवा चेहरा आहेत. नायरिका होळकर जमशेद गोदरज यांची भाची आणि स्मिता गोदरेजची मुलगी आहे. स्मिता गोदरेजचं लग्न विजय कृष्णाशी झाला आहे. नायरिका होळकरच्या नवऱ्याचं नाव यशवंत होळकर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT