Petrol Diesel Rate Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel: पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता, कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण; पाहा आजचे दर

Crude Oil Prices Plummet to 5-Year Low Fuel Rate Cuts Likely: भारतात आयात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमतीत गेल्या पाच वर्षांतील सर्वात मोठी घसरण झाली आहे. भविष्यात पेट्रोल डिझेलचे दर होण्याची शक्यता आहे.

Bhagyashree Kamble

भारतात आयात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमतीत गेल्या पाच वर्षांतील सर्वात मोठी घसरण झाली आहे. सध्या प्रति बॅरल सरासरी खर्च ७० डॉलर्सच्या खाली गेला असून, २०२१ नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलासाठी इतका कमी दर मोजावा लागत आहे. यामुळे लवकरच पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आयात खर्चात २२ टक्क्यांची घट

हिंदूस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी कच्च्या तेलाच्या आयातीचा सरासरी खर्च प्रति बॅरल $६९.३९ होता. हे दर एप्रिल २०२३ मधील $८९.४४ च्या तुलनेत २२ टक्क्यांनी कमी झाले आहेत. सोमवारी ब्रेंट क्रूडची किंमत $६५च्या खाली गेल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

जागतीक मंदीमुळे मागणीत घट

सुत्रांच्या माहितीनुसार, जागतीक विकासातील मंदी आणि ट्रेड वॉरमुळे मागणीत घट झाल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काळात कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गोल्डमॅन सॅक्सचा अंदाज

गोल्डमॅन सॅक्सने वर्तवलेल्या अंदाजानुसार, या वर्षी सरासरी कच्च्या तेलाची किंमत ६३% प्रति बॅरल राहू शकते. दुसरीकडे ओपेकने आपल्या अहवालात म्हटले की, २०२५ आणि २०२६साठी तेलाच्या मागणीचा अंदाज दररोज १ लाख बॅरलने कमी करण्यात आला आहे. यामुळे दरवर्षी सुमारे १% मागणीत घट होण्याचा अंदाज आहे.

पेट्रोलचे डिझेलचे दर घटणार

७ एप्रिल रोजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं की, तेल कंपन्यांकडे ४५ दिवसांचा साठा होता, त्यांनी त्यावेळी प्रति बॅरल $७५ ला खरेदी केली होती. मात्र, आता किंमत $६० ते $६५ डॉलर्सपर्यंत घसरल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT