landlord or tenant responsible for house painting cost Saam TV
बिझनेस

House Painting : सणासुदीत भाड्याचं घर रंगवायचंय? पैसे कोण देणार? मालक की भाडेकरू; 'हा' नियम वाचून धक्काच बसेल

landlord tenant rules : भाड्याच्या घराला रंग देण्याचा खर्च घरमालकाने करायचा की भाडेकरूने? भाडे करारातील अट, घराची नैसर्गिक झीज आणि भाडेकरूच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या नुकसानीनुसार रंगकामाचा खर्च कोण करणार, जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

landlord or tenant responsible for house painting cost : सध्या सणासुदीचे दिवस आहेत. काही दिवसात दसरा दिवाळी येणार आहे. सणाचे दिवस जवळ आले की सगळेच जण घराची साफसफाई आणि रंगरंगोटी (पेंटिंग) करायला सुरुवात करतात. पण तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल, तर एक प्रश्न नेहमी सतावत असतो. पेंटिंगचा खर्च नक्की कोणी करायचा? घरमालकाने की भाडेकरूने? यावरून अनेकदा भाडेकरून आणि घरमालक यांच्यात वाद होतात. पण याबाबतचा कायदेशीर नियम काय सांगतो? हे तुम्हाला माहिती आहे का? तेच आपण सोप्या शब्दात समजून घेऊयात..

घर रेंटवर घेताना तुम्ही केलेल्या भाडेकरारात रंग देण्याबाबत काय लिहिलंय ते सर्वात आधी तपासा. जर ॲग्रीमेंटमध्ये "दरवर्षी किंवा घर सोडताना भाडेकरूने पेंट करून द्यावे" अशी अट असेल, तर तो खर्च भाडेकरूला करावा लागतो. पण ॲग्रीमेंटमध्ये पेंटिंगचा काहीही उल्लेख नसेल, तर नियमानुसार घराची रंगरंगोटी, भिंतींची पांढरी सफेदी (व्हाईट वॉश) आणि दारे-खिडक्यांना मारलेला रंग याचा खर्च घरमालकाचीच जबाबदारी असतो.

वर्षानुवर्षे राहिल्यामुळे भिंतींचा रंग उडणे किंवा जुना दिसणे हे स्वभाविकच आहे. तुम्ही राहात असलेल्या भाड्याच्या घराचाही रंग उडाला असेल आणि दसरा दिवाळीत घर नवीन दिसावं म्हणून पेंट करायचं असेल, तर त्याचा खर्च मालकानेच करायचा असतो. पण जर भाडेकरूच्या निष्काळजीपणामुळे किंवा काही ठोकठाक केल्यामुळे भिंती खराब झाल्या असतील, तर मात्र त्याची डागडुजी आणि रंगाचा खर्च भाडेकरूला स्वतःच्या खिशातून द्यावा लागतो.

दसरा दिवाळीसाठी घर फक्त सुंदर आणि स्वच्छ दिसावं म्हणून रंगकाम करायचं असेल, तर भाडेकरूने घाबरून जाऊन स्वतःच्या खिशातून पैसे देण्याची गरज नाही. ॲग्रीमेंटमध्ये अट नसेल, तर हा खर्च घरमालकानेच उचलणे नियमाला धरून आहे. त्यामुळे कोणताही वाद न घातला भाडेकरूने घरमालकासोबत चर्चा करावी. त्यानंतर ॲग्रीमेंटमध्ये काय उल्लेख आहे, ते तपासावे. त्यानुसारच रंगकामाचे पैसे कुणी द्यायचे, हा वाद मिटेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साईबाबांच्या चरणी 4 लाख 56 हजारांचा सोन्याचा ब्रोच अर्पण

Tea- Coffee Cups: चहा- कॉफी पिण्यासाठी वापरणारे कप आरोग्यासाठी घातक? ते कधी बदलावेत? जाणून घ्या

Mumbai : मुंबईत भीषण दुर्घटना! सार्वजनिक शौचालयात केमिकल गळती, २ तरुणांचा गुदमरून मृत्यू

Banking News: रविवार असताना बँका सुरू, आजच करा महत्वाची कामं; पुढचे ३ दिवस राहणार बंद

DA Hike: कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ₹18,000 बेसिक सॅलरीवाल्यांना दरमहा ₹720 जास्त? 64% DA झाल्यास असे असेल कॅल्क्युलेशन

SCROLL FOR NEXT