Gautam Adani's Net Worth and Rank in the World's Richest People List  Gautam Adani's Rank in Richest People List - Saam TV
बिझनेस

Gautam Adani Net Worth: गौतम अदानींना अच्छे दिन; संपत्तीत घसघशीत वाढ; श्रीमंतांच्या यादीतही मोठी झेप

Gautam Adani's Rank in World's Richest Peole List: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना पुन्हा अच्छे दिन आले आहेत. अदानी यांच्या संपत्तीत घसघशीत वाढ झाली आहे.

Satish Daud

Gautam Adani Net Worth and Rank

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना पुन्हा अच्छे दिन आले आहेत. अदानी यांच्या संपत्तीत घसघशीत वाढ झाली आहे. मंगळवारी अदानी शेअर्समध्ये तब्बल २० टक्क्यांनी वाढले आहेत. अदानी समूहाच्या सर्व १० सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागांमध्ये कमालीची वाढ झाली.

अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स २० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. त्यामुळे समूहाचे मार्केट कॅप १,९२,६४६ कोटी रुपयांनी वाढून १३,८८,१८७ कोटी रुपये झाले आहेत. शेअर्समध्ये वाढ झाल्याने गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १२.३ अब्ज डॉलर्सनी वाढून ८२.५ अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संपत्तीत घसघशीत वाढ झाल्याने अदानी (Gautam Adani) यांनी श्रीमंतांच्या यादीतही १५ व्या स्थानावर झेप घेतली आहे. आता ते मुकेश अंबानी यांच्या फक्त दोन स्थानांनी मागे आहेत. जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी यांचा १३ वा क्रमांक असून त्यांची संपत्ती ९१.४ अब्ज डॉलर इतकी आहे.

आता अदानी आणि अंबानी (Mukesh Ambani) यांच्या संपत्तीत केवळ ८.९ अब्ज डॉलर्सचा फरक आहे. आशिया खंडाबाबत बोलायचं झाल्यास अंबानी श्रीमंतांच्या यादीत आशियात नंबर १ वर आहेत. तर अदानी हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. विशेष बाब म्हणजे २०२३ मध्ये अदानी यांच्या संपत्तीत एकून ३८ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.

दुसरीकडे अंबानी यांची संपत्ती सुमारे ४.३३ अब्ज डॉलर्सनी वाढली आहे. गेल्या वर्षी गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचले होते. परंतु यावर्षी २४ जानेवारी रोजी जारी करण्यात आलेल्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती.

श्रीमंतांच्या यादीत कोण कुठल्या स्थानी

जगातील श्रीमंतांच्या यादीत इलॉन मस्क २२२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत. मंगळवारी त्यांची एकूण संपत्ती २.२५ अब्ज डॉलरने वाढली. Amazon चे संस्थापक जेफ बेझोस या यादीत १७१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत.

फ्रान्सचे बर्नार्ड अर्नॉल्ट (१६९ अब्ज डॉलर्स), बिल गेट्स (134 अब्ज डॉलर्स) चौथ्या, लॅरी एलिसन (129 अब्ज डॉलर्स) पाचव्या, स्टीव्ह बाल्मर (129 अब्ज) सहाव्या, वॉरेन बफे (119 अब्ज डॉलर्स) सातव्या, लॅरी पेज (119 अब्ज डॉलर्स) आठव्या स्थानावर आहेत. मार्क झुकेरबर्ग (115 अब्ज डॉलर्स) नवव्या स्थानावर आणि सर्गे ब्रिन (113 अब्ज डॉलर्स) दहाव्या स्थानावर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT