Asian Development Bank saam tv
बिझनेस

G20 Summit: भारताचं स्वप्न होणार पूर्ण; एशियन डेव्हलपमेंट बँक देणार सवलतीच्या व्याजदरानं कर्ज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

G20 Summit

भारताचं व्हिजन पूर्ण करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक (Asian Development Bank)मदत करणार आहे. एडीबीचे अध्यक्ष मासासुगु असकावा (Masasugu Asakawa) हे जी20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दिल्ली आले होते. यावेळी त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशी चर्चा केली. (Latest News on G20)

अर्थमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर एडीबीनं सांगितलं की, भारताला त्याचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी ग्रीन फायनान्सिंग सुविधेद्वारे सवलतीच्या दरानं कर्ज देण्यात येईल. दरम्यान, भारताकडे जी२० परिषदेचं अध्यक्षपद असल्यानं काय परिणाम झाले याची चर्चा एडीबी अध्यक्षांनी अर्थमंत्र्यांशी केली. तसेच जी२० च्या वर्क स्ट्रीमअंतर्गत फायनान्स ट्रेक आणि शेरपा ट्रेकमध्ये एडीबीच्या योगदानाविषयीही चर्चा यावेळी झाली.

यासह एडीबी अध्यक्षांनी पंतप्रधान मोदी यांच्या व्हिजनसाठी एडीबी कंट्री पार्टनरशीप स्ट्रेटेजी २०२३-२०२७ च्या अंतर्गत सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. भारताच्या पीएम गती शक्ती, ग्रीन हायड्रोजन हबलाही त्यांनी पाठिंबा दिला. भारत एडीबीमध्ये प्रमुख आणि चौथा सर्वात मोठा शेअर होल्डर आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत भारतामध्ये ५२.६ अब्ज डॉलर सेक्टर लोन, ग्रांट्स आणि टेक्निकलला पाठिंबा देण्याचं आश्वासन एडीबीनं दिलंय. तसेच खासगी क्षेत्रात ८ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

दरम्यान, या जी २० परिषदेत भारतानं वन अर्थ, वन फॅमिली आणि वन फ्यूचर हा मूलमंत्र जगाला दिला. ही परिषदे भारतासाठी खूप फायदेशीर राहिली. यात ११२ प्रस्तावांना या संमत केलं गेलं. त्यांच्यावर सर्व देशांनी सह्या केल्या. याआधी २०१७ झालेल्या जी२० शिखर परिषदेत ६० आउटकम निघाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

SCROLL FOR NEXT