Manasvi Choudhary
सकाळी नाश्त्याला पालक पराठा हा हेल्दी नाश्ता आहे. पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा बनवण्याची रेसिपी सोपी आहे.
पालक पराठा बनवण्यासाठी पालक, गव्हाचे पीठ, हिरवी मिरची, आले- लसूण पेस्ट, हळद, ओवा, पांढरे तीळ, मीठ, दही, तेल किंवा तूप हे साहित्य एकत्र घ्या.
पालक पराठा बनवण्यासाठी पालक स्वच्छ धुवून घ्या आणि बारीक चिरून पिठात मिक्स करा.
एका परातीत गव्हाचे पीठ घ्या. त्यात पालकाची प्युरी आले - लसूण मिरची, हळद, ओवा, तीळ मीठ आणि दही मिक्स करा.
थोडे थोडे पाणी घालून पीठ मध्यम मऊ मळून घ्या. मळलेल्या पिठावर थोडे तेल लावून १० मिनिटे झाकून ठेवा.
पिठाचे छोटे गोळे करून गोल किंवा त्रिकोणी पराठा लाटून घ्या. लाटताना थोडे कोरडे पीठ वापरा.
गॅसवर गरम तव्यावर पराठा टाकून त्यावर तूप लावा आणि दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्या.