Manasvi Choudhary
संध्याकाळी नाश्त्याला तुम्हाला देखील चटपटीत काहीतरी खायचं असेल तर तुम्ही घरीच आलू चिली बनवू शकता.
घरी आलू चिली बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही सहज घरी आलू चिली बनवू शकता.
आलू चिली बनवण्यासाठी बटाटा, कॉर्नफ्लोअर, मैदा, आले- लसूण पेस्ट, भाज्या, कांदा, हिरवी मिरची, रेड चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस, तेल, कांदाभाजी हे साहित्य एकत्र करा.
आलू चिली बनवण्यासाठी सर्वात आधी बटाटे कापून स्वच्छ धुवून घ्या. एका बाऊलमध्ये बटाटे घेऊन त्यात कॉर्नफ्लोअर, मैदा, थोडे मीठ आणि आले-लसूण पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये बटाटे मध्यम आचेवर कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत तळून घ्या
गॅसवर दुसऱ्या बाजूला कढईमध्ये गरम तेलामध्ये चिरलेला लसूण, आलं, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि सिमला मिरची परतून घ्या.
या मिश्रणात सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो केचप आणि व्हिनेगर घाला. थोडे मीठ घाला तसेच यात थोडा कॉर्नफ्लोअर मिक्स करा. नंतर यात फ्राय केलेले बटाटे मिक्स करा.