Masala Khichdi Recipe: हॉटेलसारखी मसाला खिचडी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

खिचडी

खिचडी हा पचायला हलका, पौष्टिक आणि झटपट तयार होणारा पदार्थ आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच मसाला खिचडी खायला आवडते.

Masala Khichdi Recipe

सोपी रेसिपी

मसाला खिचडी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने मसाला खिचडी बनवू शकता.

Masala Khichdi Recipe | yandex

मसाला खिचडी साहित्य

मसाला खिचडी बनवण्यासाठी तांदूळ, मुगाची डाळ, कांदा, टोमॅटो, बटाटा, मटर, आले- लसूण पेस्ट, हळद, मसाला, तूप, तेल, जिरे, मोहरी, हिंग आणि गरम मसाला हे साहित्य एकत्र करा.

Masala Khichdi Recipe | Saam tv

तांदूळ स्वच्छ धुवा

मसाला खिचडी बनवण्यासाठी तांदूळ आणि मुगाची डाळ एकत्र करून स्वच्छ धुवून घ्या आणि १०-१५ मिनिटे भिजत ठेवा.

Masala Khichdi Recipe

फोडणी द्या

गॅसवर कुकरमध्ये तूप किंवा तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि लवंग घालून फोडणी द्या

Masala Khichdi Recipe | Social Media

भाज्या मिक्स करा

या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परता. त्यानंतर आले-लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.

Masala Khichdi Recipe

मसाले मिक्स करा

हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालून मिक्स करा. त्यानंतर बटाटा आणि मटार घालून १ मिनिट परतून घ्या

Spicy spices

डाळ मिक्स करा

संपूर्ण मिश्रणात भिजवलेली डाळ आणि तांदूळ कुकरमध्ये घालून मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करा नंतर चवीनुसार मीठ आणि गरम पाणी मिक्स करा.

Masala Khichdi Recipe

मसाला खिचडी तयार

कुकरचे झाकण लावून मसाला खिचडी शिजवून घ्या. खिचडीवर कोथिंबीर घालून सर्व्हसाठी तयार करा.

Masala Khichdi Recipe

Next: Furniture Design: घराच्या शोभेसाठी हे आहेत 5 स्पेस-सेव्हिंग फर्निचर डिझाईन्स

येथे क्लिक करा...