Rule Change Saam Tv
बिझनेस

Rule Change: UPI ते EPFO; आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बदलले हे ७ नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

Rule Change From Today 1st January 2025: आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अनेक नियमांमध्ये बदल झाले आहे. यूपीआय ते पेन्शनच्या नियमांमध्ये बदल झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम होणार आहे.

Siddhi Hande

नवीन वर्ष आजपासून सुरु झाले आहे. नवीन वर्षात अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. यामध्ये एलपीजी गॅसच्या किंमतीपासून ते ईपीएफओच्या नियमांमध्ये बदल झाले आहे. त्यामुळे घरगुती गॅसपासून ते अगदी सेवानिवृत्त झालेल्या नागरिकांच्या खिशावर परिणाम होणार आहे. (Rule Change From 1st January 2025)

LPG च्या किंमती (LPG Price)

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नवीन वर्षात एलपीजी गॅसच्या किंमती कमी झाल्या आहेत. व्यावसायिक गॅसच्या किंमती कमी झाल्या आहेत.

EPFO चा नियम (EPFO Rule Change)

नवीन वर्षात पेन्शनधारकांसाठी नियम बदलण्यात आले आहेत. आता पेन्शनधारक कोणत्याही बँक खात्यातून पैसे काढू शकणार आहेत. याआधी फक्त रजिस्टर बँक खात्यातून पैसे काढता येत होते.

UPI लिमिट (UPI Limit)

नवीन वर्षात UPI 123 वर व्यव्हार करण्याची लिमिट वाढवण्यात आली आहे. आता तुम्ही एका वेळी कमाल १०,००० रुपये पाठवू शकतात. याआधी ही लिमिट ५,००० रुपये होती.

रुपे कार्डधारकांना लाउंजचा लाभ

रुपे कार्जधारकांना आता विमानतळावरील लाउंजचा मोफत वापर करता येणार आहे. यामुळे सतत परदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे.

एनबीएफसींच्या मुदतठेवींच्या नियमांमध्ये बदल

१ जानेवारीपासून एनबीएफसींच्या मुदत ठेवींसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. यात मॅच्युरिटीपूर्वी मुदतठेवी मोडणाऱ्या, तसेच ठेवींसाठी दिले जाणाऱ्या नामांकनाबाबत नियमांचा समावेश आहे.

आयकर नियम (Income Tax Rule)

२०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आयकरबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.या नवीन नियमांमुळे कर सवलत आणि कर कपातीत बदल होणार आहेत. नागरिकांना कर कपातीचा फायदा होऊ शकतो.

या फोनवर व्हॉट्सअॅप होणार बंद

१ जानेवारीपासून काही अँड्रॉइड स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. जवळपास २० फोनवर व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. अँड्रॉइड ५.० आणि नवीन अँड्रॉइड स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप सेवा सुरु राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

SCROLL FOR NEXT