AI च्या या वेगवान काळात तुम्हाला जी हवी ती माहिती अगदी क्षणार्धात तुमच्यासमोर असते...फक्त काही शब्द टाईप केल्यावर तुम्हाला त्या विषयातली संपूर्ण माहिती उपलब्ध होते.....आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्यात....आणि अगदी मोठ्या उद्योगपतीपासून ते सामान्य माणसंही AI चा वापर त्यांच्या दैनंदिन आयुष्यात करतात.
दरम्यान आता यापेक्षाही एक पाऊल पुढे जात META AI ने मोठा चमत्कार केलाय असं म्हणणे अतिश्योक्ती ठरणार नाही...कारण चक्क तुम्ही जो काही विचार करणार ते थेट टाईप होणार अशी टेक्नोलॉजी META ने डेव्हलप केलीये.
META ने डेव्हलप केलेली ही सिस्टम म्हणजे ब्रेन टाईपिंग सिस्टम....
२०१७ साली मेटाने याची घोषणा केली होती...आणि अखेर इतक्या वर्षांच्या रिसर्चनंतर ब्रेन टाईपिंग सिस्टम तयार झालीये.
न्यूरोसायन्सच्या अभ्यासाने ब्रेन टाईपिंग सिस्टमचा विकास
मॅग्नेटोएन्सेफेलोग्राफी (MEG) मशीनचा वापर
ही मशिन संवेदनशील असून विशेष वातावरणीय स्थितीतच काम करते
मेटाने Brain2Qwerty असे AI बनवले आहे
जे ब्रेन सिग्नल अॅनलिसिस करून टाईपिंग करते
या सिस्टमची तपासणी एकूण ३५ जणांवर करण्यात आली आणि ८० टक्के अचूकतेने टाईपिंग होत असल्याचे समोर आले.
त्यामुळे अजूनही ही सिस्टम १०० टक्के अचूक नाहीये. सोबतच ब्रेन टाईपिंग सिस्टम सामान्य माणसांच्या वापरात येण्यास अनेक अडचणी आहेत...मुख्य म्हणजे याचे डिव्हाईस एका नियंत्रित परिस्थितीतच काम करते..त्याचे वजन जवळपास अर्धा टन असून किंमत साडे सोळा कोटी आहे. त्यामुळे आता यावर अजून रिसर्च करून युजर फ्रेंन्डली करण्यावर मेटाचा भर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.