आयुष्यात कितीही खडतर परिस्थिती असली तरीही त्यावर जो व्यक्ती मात करतो तो नक्कीच यशस्वी होतो. असंच काहीसं प्रेमसुख डेलू यांच्यासोबत झालं. त्यांची आर्थिक परिस्थितीत खूपच बिकट होती. दोन वेळच्या जेवणासाठी त्यांनी वणवण करायला लागायची. अशा परिस्थितीतदेखील त्यांनी हार मानली नाही. त्यांनी सरकारी अधिकारी होण्याचे ठरवले आणि त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. (Success Story)
राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील एका गावात प्रेमसुख डेलू यांचे बालपण गेले. त्यांचे वडील त्यावेळी उंट गाडी चालवून कुटुंबाचे पालनपोषण कर होते. लहानपणी प्रेमसुख हेदेखील गाय-म्हशी चरायला घेऊन जायचे. परंतु त्यांनी अशा परिस्थितीही अभ्यासावर काहीच परिणाम होऊ दिला नाही.
प्रेमसुख यांची आर्थिक परिस्थितीत खूप बेताची होती. त्यांनी आपल्या कुटुंबाला या परिस्थितीतून बाहेर काढायचे ठरवले.त्यांनी सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णदेखील केले.
प्रेमसुख यांनी सरकारी शाळेत शालेय शिक्षण घेतले. त्यांनी लहानपणापासूनच सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहिले होते.२०१० मध्ये पदवीधर झाल्यानंतर त्यांनी पटवारी भरती परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर ते पटवारी म्हणून कामकरु लागले.
यानंतरही त्यांनी आपला अभ्यास सुरु ठेवला.प्रेमसुख यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण सरकारी शाळेत घेतले. त्यानंत त्यांनी सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी एमए केले. यानंतर त्यांनी UGC NET परिक्षादेखील क्रॅक केली. (UPSC Success Story)
प्रेमसुख यांनी १२ सरकारी नोकरी मिळवल्या. त्यांनी पटवारी पदापासून सुरुवात केली ते राजस्थान ग्रामसेवक परीक्षेत दुसरा क्रमांक पटकावला. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली. दुसऱ्याच प्रयत्नात त्यांना यश मिळाले. ते सध्या आयपीएस म्हणून कार्यरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.