Redmi Note 13 5G
Redmi Note 13 5G Saam Tv
बिझनेस

6GB RAM आणि 108MP; Redmi Note 13 5G फोन फक्त 590 रुपयात घरी घेऊन जाण्याची संधी; काय आहे ऑफर?

साम टिव्ही ब्युरो

Redmi Note 13 5G:

तुम्ही कमी किंमत जबरदस्त फीचर्स आणि कॅमेरा असलेला फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला एक खास डीलबद्दल सांगणार आहोत. यामध्ये तुम्ही 6GB रॅम आणि 108MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन खरेदी करू शकता. Flipkart सेलमध्ये Redmi Note 13 5G फोन मोठ्या डिस्काउंटसह विकला जात आहे. हा फोन तुम्ही फक्त 590 रुपयांच्या EMI वरही खरेदी करू शकता.

Redmi Note 13 5G वर मोठी सूट

फ्लिपकार्टवर या फोनवर 2,225 रुपयांची बंपर सूट दिली जात आहे. डिस्काउंटनंतर फोनची किंमत फक्त 16,774 रुपये रुपये होते. या फोनच्या खरेदीवर काही बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत. ज्याचा फायदा घेऊन तुम्ही फोनची किंमत आणखी कमी करू शकता. जर तुमच्याकडे SBI क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 1000 रुपयांची सूट मिळू शकते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Redmi Note 13 5G चे फीचर्स

Redmi Note 13 5G मध्ये 1080x2400 पिक्सेल, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,000 nits पर्यंत रिझोल्यूशनसह 6.67-इंच फुल HD+ AMOLED डिस्प्ले ग्राहकांना मिळतो. फोन 6nm MediaTek Dimensity 6080 चिपने सुसज्ज आहे. फोनमध्ये एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप, ॲम्बियंट लाइट सेन्सर, ई-कंपास आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर आहे.   (Latest Marathi News)

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, Redmi Note 13 5G मध्ये 108-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आहे. तर समोर 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.3, GPS, USB टाइप-C आणि 3.5mm हेडफोन जॅक समाविष्ट आहे.

Redmi Note 13 5G मध्ये 5,000mAh बॅटरी आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. Redmi Note 13 5G Android 13 वर आधारित MIUI 14 वर काम करतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Team India: बार्बाडोसमध्ये अडकलेली टीम इंडिया आज येणार मायदेशी? का अडकले होते खेळाडू?

Rohit Sharma Barbados VIDEO: T20 चॅम्पियन झाल्यानंतर रोहितने पिचवरची माती का खाल्ली?

Amazon Prime Day 2024 सेल या दिवशी भारतात होणार लाईव्ह, मिळणार या जबरदस्त ऑफर्स

Special Report : 1 लाख टन कांदा खरेदीचा घोटाळा?; फेडरेशनच्या नावाखाली व्यापारी-अधिकाऱ्यांकडून लूट?

VIDEO: आधी हिजाबबंदी, आता ड्रेसकोडवरून चेंबूरमधील कॉलेजचा व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला?

SCROLL FOR NEXT