Flipkart Sale  Saam Tv
बिझनेस

Flipkart Sale सुरु! अवघ्या ७ हजार रुपयांत टीव्ही आणि वॉशिंग मशीन, जाणून घ्या सर्व ऑफर

Vishal Gangurde

Flipkart Sale Update : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर नवा सेल सुरु झाला आहे. प्लॅटफॉर्मवर Big billion Days sale सुरु होता. हा सेल ६ ऑक्टोबर रोजी संपला. हा सेल संपल्यानंतर कंपनीने बिग शॉपिंग उत्सव सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये जवळपास सर्व वस्तूंवर ऑफर पाहायला मिळत आहे.

९ ऑक्टोबर रोजी सुरु झालेला सेल हा १३ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. या सेलमध्ये बँक डिस्काऊंट, नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर मिळत आहे. तसेच काही प्रोडक्ट्सवर फ्लॅट डिस्काऊंट देखील मिळत आहे.

स्मार्टफोनवर मिळत आहे मोठी सूट

फ्लिपकार्ट सेल सुरु असल्याने तुम्ही स्वस्तात मोबाईल खरेदी करू शकता. या सेलमध्ये आयफोन १५ आणि आयफोन २५ प्लसवर आकर्षक डील मिळत आहे. तुम्हाला या सेलमध्ये आयफोन १५ हा ५२ हजार रुपयांमध्ये मिळत आहे. आयफोन १५ प्लस हा फोन तुम्हाला ५९,९९९ रुपयांमध्ये मिळत आहे.

या व्यतिरिक्त सेलमध्ये १० हजार रुपयांमध्ये ५ जी फोन खरेदी करू शकता. तर फ्लिपकार्ट सेलमध्ये गुगल पिक्सल ८ वर देखील आकर्षक ऑफर मिळत आहे. या फोनला तुम्ही ३६ हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या व्यतिरिक्त सॅमसंग गॅलक्सी S23 आणि गॅलेक्सी S23 FE या मोबाईलवर चांगल्या ऑफर मिळत आहे.

तुम्ही या सेलमध्ये टीव्ही आणि होम अप्लायन्स ९० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंटवर खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्ही स्वस्तात टीव्ही खरेदी करू शकता. तर वॉशिंग मशीनवरही चांगला डिस्काऊंट मिळत आहे. सेलमध्ये मोबाईलची सुरुवातीची किंमत ६,९९९ रुपये आणि वॉशिंग मशीनची सुरुवातीची किंमत ६,२९० रुपये इतकी आहे.

सेलमध्ये रेफ्रिजरेटरवरही ऑफर आहे. तर सेलमध्ये फ्रिजची किंमत ७,४९० रुपये इतकी आहे. तर किचन अप्लायन्सवर देखील ऑफर असून सुरुवातीची किंमत ४९९ रुपये इतकी आहे. तर सेलमध्ये तुम्हाला स्मार्ट गॅजेट्सवर आकर्षक ऑफर आहे. या सेलमध्ये ९९९ रुपयांच्या किंमतीवर साऊंड बार मिळत आहे. प्रीमियम ईयरबड्सवरही डिस्काऊंट ऑफर मिळत आहे. तर तुम्ही १९९ रुपयांमध्ये मोबाईलसाठी फोनचं कव्हर खरेदी करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates: मंत्री आदिती तटकरे यांचं कौतुक करताना मुख्यमंत्री शिंदेंची राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका

IND vs BAN 2nd T20I: दिल्लीत रिंकू-रेड्डी शो! हार्दिक- रियानचा फिनिशिंग टच अन् टीम इंडिया २०० पार

Maharashtra Politics : काँग्रेस पडले, 'ठाकरे' नडले; हरियाणातील पराभवानंतर संजय राऊतांनी काय इशारा दिला? VIDEO

OBC Community: मोठी बातमी; ओबीसीमध्ये नव्या १५ जातींचा समावेश करण्याची केंद्राकडे राज्य सरकारची शिफारस

Nitish Kumar Reddy: 6,6,6,6,6,6,6..,'रेड्डी इज रेडी'! दिल्लीत नितीशचं वादळ

SCROLL FOR NEXT