POCO M6 5G Saam Tv
बिझनेस

50MP AI कॅमेरा, 5000mAh बॅटरी, फक्त 8,249 रुपयांमध्ये जबरदस्त स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी

Flipkart Sale 2024: POCO M6 5G चा बेस व्हेरिएंट भारतात लॉन्च झाला आहे. या फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी असून याची किंमतही खूपच कमी आहे

साम टिव्ही ब्युरो

मोबाइल उत्पादक कंपनी POCO ने गेल्या वर्षी POCO M6 5G भारतात लॉन्च केला होता. फोन तीन रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये येतो. यात 4GB + 128GB, 6GB + 128GB, आणि 8GB + 256GB चा समावेश आहे. आता कंपनीने POCO M6 5G चा बेस व्हेरिएंट भारतात लॉन्च केला आहे.

या फोनला बजेट सेगमेंटमध्ये व्हॅल्यू फॉर मनी फोन म्हणता येईल. कारण या फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी असून याची किंमतही खूपच कमी आहे. यातच POCO M6 5G वर उपलब्ध असलेल्या ऑफर आणि याच्या किंमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

फ्लिपकार्ट बॅनरनुसार, POCO M6 5G चा नवीन व्हेरिएंट 4GB रॅमसह सुसज्ज आहे, जो 64GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. या Poco फोनची किंमत 8,249 रुपये ठेवण्यात आली आहे. M6 5G चा 4GB + 64GB व्हेरिएंट 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा फोन ओरियन ब्लू, पोलारिस ग्रीन आणि गॅलेक्टिक ब्लॅक रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे.

यात HD+ रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह 6.4-इंचाचा डिस्प्ले ग्राहकांना मिळेल. फोन Dimensity 6100+ प्रोसेसरला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

POCO M6 5G मध्ये ड्युअल-टोन लूक आहे. यात AI लेन्ससह 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. यात 5MP सेल्फी स्नॅपर आहे. याचा पॉवर बटण फिंगरप्रिंट स्कॅनर म्हणून देखील काम करतो. सॉफ्टवेअर बद्दल बोलायचं झालं तर, हा फोन दोन ओएस अपडेट्स आणि तीन सेफ्टी पॅचसह येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT