Flight Travelling Rules Saam Tv
बिझनेस

Flight Travelling Rules: विमानाने प्रवास करण्यापूर्वी हे ७ नियम वाचाच, अन्यथा एअरपोर्टवर होईल फजिती

Flight Travel Rules: विमानाने प्रवास करताना काही नियमांचे आपल्याला पालन करावे लागते. या नियमांचे पालन केल्यावर तुम्हाला कोणत्याही अडचणी येणार नाही.

Siddhi Hande

विमानाने प्रवास करायचे अनेकांचे स्वप्न असते. विमानाने तुम्हा देशांतर्गत तसेच इंटरनॅशनल ट्रॅव्हलदेखील करु शकतात. विमानाने प्रवास करताना काही नियमांचे पालन करायचे असते. काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला हव्यात. जर तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला ट्रॅव्हलिंग करताना आणि एअरपोर्टवर काय गाइडलाइन्स फॉलो करायला हव्यात याबाबत माहिती देणार आहोत.

१. विमान प्रवासासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? - What documents are required for air Travel?

ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट)

बोर्डिंग पास किंवा तिकीट (डिजिटल किंवा हार्ड कॉपी)

एअरलाइन अॅप किंवा ईमेलवर बुकिंगची माहिती

इंटरनॅशनल प्रवासासाठी कागदपत्रे

पासपोर्ट (६ महिन्याची वॅलिडीटी असलेला)

व्हिसा (Visa)

रिटर्न किंवा पुढच्या प्रवासाचे तिकीट

लसीकरण प्रमाणपत्र

ट्रॅव्हल इन्श्युरन्स

२. विमानतळावर सुरक्षा तपासणी कशी केली जाते? - How is security screening done at the airport?

तुम्हाला देशांतर्गत प्रवासासाठी २-३ तास आधी एअरपोर्टवर पोहचणे गरजेचे

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ३-४ तास आधी विमानतळावर पोहचावे

सिक्युरिटी चेकिंग करताना लॅपटॉप, मोबाईल, पाणी, द्रवपदार्थ दाखवणे

तुम्ही फक्त १०० मि.ली द्रवपदार्थ नेऊ शकतात.

बेल्ट, घड्याळ, जॅकेट, शूट तपासणीसाठी काढून उभे राहा

३. विमान प्रवासासाठी किती सामान नेता येते? - How much baggage can you carry on a flight?

चेक इन सामान(Check-in Baggage)

देशांतर्गत- १५-२५ किलो

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी -२०-३५ किलो

अतिरिक्त वजनाच्या सामानासाठी शुल्क

हँड बॅग (Cabin Baggage)

७-१० किलो (१ बॅग, लहान पर्स किंवा लॅपटॉप बॅग)

एअरपोर्टवर चेक इन प्रोसेस (Airport Check-In Process Explained)

ऑनलाइन चेक इन २४-४८ तास आधी

एअरलाइन काउंटरवर बॅगेज ड्रॉप करा

सुरक्षा तपासणी करा

बोर्डिंग गेटवर अर्धा-एक तास आधी पोहचा

बोर्डिंग १५-२० मिनिटे आधी बंद होते.

४.विमान प्रवासासाठी कोणते आरोग्य नियम पाळावे लागतात? - What health rules should be followed during air travel?

काही विमानांमध्ये मास्क गरजेचे

सॅनिटाइझर

कोणत्याही वस्तूला स्पर्श करु नये

अस्वस्थ वाटल्यास क्रू मेंबर्सना बोलवा

५. विमानात असताना कोणत्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे?

स्मार्टफोन फ्लाइट मोडवर ठेवा

सीटबेल्ट लावा

इतर प्रवाशांना त्रास देऊ नका

क्रू मेंबर्सने सांगितलेल्या गोष्टींचे पालन करा

६. फ्लाइट लेट किंवा रद्द झाली तर काय करावे? - What to do if your flight is delayed or cancelled?

फ्लाइट लेट किंवा रद्द झाल्यावर एअरलाइनकडून सांगितले जाते

एअरलाइनकडून तुम्हाला जेवणाचे कूपन, दुसरे फ्लाइट, रिफंड किंवा रिबुकिंगचा ऑप्शन मिळू शकतो.

७. इमिग्रेशन प्रक्रियेत कोणते दस्तऐवज आवश्यक असतात? - What documents are required in the immigration process?

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी इमिग्रेशन विभागात पासपोर्ट, व्हिसा दाखवा

सामान जमा करा

कस्टम तपासणीसाठी वस्तू द्या. तुम्ही जर परदेशातून भारतात काही वस्तू आणत असाल तर त्याचे बिल, पावती सांभाळून ठेवा.

जास्त प्रमाणात कॅश असल्यावर सांगा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT