Rules Changes  Saam Tv
बिझनेस

New Rules: १ फेब्रुवारीपासून 'हे' ५ मोठे होणार बदल; कार महागणार, बँकेचे नियम बदलणार, सामान्य नागरिकांना फटका

Rule Changes From 1 February: उद्यापासून होणाऱ्या या बदलांचा परिणाम थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. पुढील महिन्यापासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती आणि यूपीआयशी संबंधित नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

उद्यापासून नव्या महिन्याला सुरुवात होणार आहे. याशिवाय उद्या म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासोबतच नवीन महिन्यात काही नवीन बदलही होणार आहेत. हे होणार बदल आर्थिकदृष्ट्या संबंधित असणार आहेत.

उद्यापासून होणाऱ्या या बदलांचा परिणाम थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. पुढील महिन्यापासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती आणि यूपीआयशी संबंधित नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे. हे बदल कोणते असणार आहेत ते जाणून घेऊया.

LPG च्या किमतींमध्ये बदल

प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला देशभरात एलपीजीच्या किमती सुधारल्या जातात. तेल विपणन कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमती अपडेट करतात. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पाच्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात होणार की वाढणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सिलिंडरच्या किमतीतील बदलाचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

UPI शी संबंधित नियम

यंदाच्या नव्या महिन्यात यूपीआयशी संबंधित नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही UPI व्यवहार ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियम 1 फेब्रुवारी 2025 पासून लागू होतील. पुढील महिन्यात 1 फेब्रुवारीपासून, विशेष कॅरेक्टर्स असलेल्या आयडीसह व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत.

मारूतीच्या गाड्या होणार महाग

गाडी घेणाऱ्यांना उद्यापासून फटका बसण्याची शक्यता आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL) ने वाढत्या इनपुट खर्च आणि ऑपरेटिंग खर्च लक्षात घेऊन या वर्षी 1 फेब्रुवारीपासून आपल्या कारच्या विविध मॉडेल्सच्या किमती 32,500 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलंय. ज्या मॉडेल्सच्या किमती वाढतील त्यामध्ये Alto K10, S-Presso, Celerio, Wagon R, Swift, DZire, Brezza, Ertiga, Eeco, Ignis, Baleno, Ciaz, XL6, FrontX, Invicto, Jimny आणि Grand Vitara यांचा समावेश आहे.

बँकेच्या नियमांमध्ये होणार बदल

कोटक महिंद्रा बँकेने त्यांच्या ग्राहकांना 1 फेब्रुवारी 2025 पासून लागू होणाऱ्या सामान्य सुविधा आणि शुल्कांमधील आगामी बदलांबद्दल माहिती दिलीये. यामध्ये मोफत एटीएम व्यवहार मर्यादा आणि विविध बँकिंग सेवांसाठी अपडेटेड फीस यांचा समावेश आहे.

ATF च्या दरामध्ये होणार बदल

1 फेब्रुवारीपासून एअर टर्बाइन इंधन (ATF) च्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एअर टर्बाइन इंधनाच्या किमती सुधारतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

कार मंदिरात घुसली; ५-६ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्या | Chhatrapati Sambhajinagar

SCROLL FOR NEXT