पत्नीच्या नावाने कार घेतल्यास रोड टॅक्समध्ये सवलत
महिलांसाठी कार कर्जाचे व्याजदर तुलनेने कमी
वाहन विम्यावरही खर्चात बचत
कार खरेदी करणे ही एक मोठी गुंतवणूक आहे, पण कार खरेदी करताना थोडासा समजूतदारपणा दाखवला तर हजारो, लाखो रुपयांचा फायदा होत असतो. पण काय आपल्यातील बहुतेक जण कार घेतांना स्वत:च्या नावाने गाडी खरेदी करत असतात.
परंतु त्यावेळी तुम्ही जरा डोकं वापरलं आणि वाहन बायकोच्या नावाने गाडी घेतली तर किंवा तिच्या नावावर कर्ज घेतले तर अनेक फायदे मिळू शकतात. यामुळे फक्त पैसे वाचतात असे नाही तर महिलांना प्रगती करण्यास देखील मदत होत असते. तुमच्या पत्नीच्या नावावर कार खरेदी करणे कसे फायदेशीर ठरू शकते ते जाणून घेऊ.
भारतातील अनेक राज्यांमध्ये, महिलेच्या नावाने वाहन नोंदणी केली तर रोड टॅक्समध्ये सूट दिली जाते. ही सवलत २ टक्के ते १०टक्क्यांपर्यंत असते. काही राज्यांमध्ये आणखी जास्त असू शकते. उदाहरणार्थ जर कर्नाटकमध्ये महिलेच्या नावावर कार घेतली तर रोड टॅक्समध्ये अंदाजे १० टक्के सूट मिळते. जर तुम्ही १५ लाख रुपयांची कार खरेदी केली तर तुम्हाला २०,००० ते ४०,००० रुपयांची थेट बचत होऊ शकते.
बँका आणि वित्त कंपन्या महिलांना कार खरेदीसाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावर कमी व्याजदर देतात. साधारणपणे ही सवलत ०.२५ टक्के ते ०.५०टक्क्यांनी पर्यंत असते. ७ वर्षांसाठी २० लाख रुपयांचे कार कर्ज घेतल्यास अंदाजे ५०,००० ते १००,००० बचत होऊ शकते. जर पत्नीचे स्वतंत्र उत्पन्न असेल, तर संयुक्त कर्ज घेतल्याने आणखी जास्त फायदे मिळू शकतात.
पत्नीच्या नावाने कार कर्ज घेतल्याने इनकम टॅक्समध्ये सवलत मिळू शकते. कर्जाची मूळ रक्कम कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळू शकते आणि व्याज कलम 24B अंतर्गत कर सवलत मिळत असते. जर पत्नी टॅक्स भरत असेल तर दोघीजण मिळून अजून जास्त फायदा मिळू शकतो.
काही विमा कंपन्या महिला कमी प्रीमियमवर विमा देतात. आकडेवारीनुसार, अपघातांमध्ये जास्त महिला बळी ठरत नाहीत. म्हणून त्यांना विम्यावर ५ ते १० टक्के सूट मिळत असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.