Financial Planning Tips Saam Tv
बिझनेस

Financial Planning Tips : नुकतेच लग्न झालेय, नोकरीला लागलात? असे करा आर्थिक नियोजन, पैशांची चणचण कधीच भासणार नाही

Money Management Tips : बरेचदा कुटुंब नियोजन करताना आपण आर्थिक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.

कोमल दामुद्रे

Financial Planning After Marriage : लग्नानंतर आपल्या आयुष्यात अनेक बदल होतात. जबाबदारी वाढते, आर्थिक गोष्टींचा सामना करावा लागतो. बरेचदा कुटुंब नियोजन करताना आपण आर्थिक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.

काही काळानंतर, जेव्हा अधिक जबाबदारी वाढते, तेव्हा आपण आर्थिक नियोजनाकडे लक्ष देतो. तसे, नोकरी सुरू करण्याबरोबरच आर्थिक नियोजनही करायला हवे. जितक्या लवकर तुम्ही आर्थिक नियोजन सुरू कराल तितक्या लवकर तुम्हाला भविष्याच्या चिंतेपासून आराम मिळेल. जाणून घेऊया लग्नानंतर आर्थिक नियोजन कसे सुरु करायचे

1. खर्चाचे व्यवस्थापन

जेव्हा आपण नोकरी (Job) करतो तेव्हा आपल्या खर्चावर नियंत्रण कसे ठेवायचे हे आपल्याला माहित असले पाहिजे. आपला पैसा कुठे खर्च होतोय हे कळायला हवं. तुम्ही अनावश्यक खर्च करत असाल तर लगेच थांबवा. पैसे (Money) खर्च करताना नेहमी विचार करुन खर्च करायला हवे. यासाठी तुम्ही तुमच्या महिन्याचा बजेट तयार करा व त्यानुसार खर्च करा.

2. बचत करा

जर आपण पैसे वाचवले नाहीत तर आपण आपले भविष्य सुरक्षित करू शकत नाही. लग्नानंतर खर्चही वाढतो. अशा परिस्थितीत बचतीकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. आपण जास्तीत जास्त पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही अजून बचत (Saving) सुरू केली नसेल , तर तुम्ही लवकरात लवकर बचत सुरू करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक करू शकता.

3. सेवानिवृत्तीची योजना

वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर आपल्याकडे निवृत्तीचे नियोजन असायला हवे. यासाठी आपण त्याचे पूर्वनियोजन करायला हवे. मुलाच्या जन्मानंतर, त्याच्या शिक्षणाचा खर्च वाढतो. तुम्ही या खर्चाकडे दुर्लक्ष करू शकत नाही पण तुम्ही तुमच्या निवृत्तीसाठीही नियोजन केले पाहिजे. निवृत्तीनंतरही दरमहा उत्पन्न मिळावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशा परिस्थितीत तुम्ही काही सरकारी योजनांसोबत पीएफ फंड किंवा म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Cancer: किडनी कॅन्सरच्या सुरुवातीची लक्षणे कोणती? जाणून घ्या

Maharashtra Live News Update : आहिल्यानगरमधील करमाळामध्ये दोन गटात राडा; रोडवरील चौकाला नाव देण्यावरून दोन पेटला वाद

BJP : काश्मीर फाईल्ससारखा 'मालेगाव फाईल्स' सिनेमा झाला पाहिजे, भाजप खासदाराची मागणी

स्वतःचा पक्ष वेशीला टांगणाऱ्यांनी शिवसेनेवर बोलू नये – आंबादास दानवेंचा राणेंवर हल्लाबोल|VIDEO

Bullet Train: बुलेट ट्रेन लवकरच धावणार; मुंबई-अहमदबाद प्रवासाचे २ तास वाचणार, जाणून घ्या ट्रेनचा ताशी स्पीड अन् थांबे?

SCROLL FOR NEXT