Interest Rate On Saving Scheme Saam Tv
बिझनेस

Interest Rate: सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी; बचतीवर व्याजदर जैसे थे वैसे; वाचा सविस्तर

Interest Rate On Saving Scheme: सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. वित्त मंत्रालयाने तिमाहीसाठी व्याजदर जैसे थे वैसे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Siddhi Hande

सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. योजनांमध्ये किंवा एफडीमधील गुंतवणूकीवर व्याजदर जैसे थे वैसे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठी व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्थ खात्याकडून ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठी व्याजदर जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने तिमाहीसाठी लघुबचत योजनांच्या व्याजदरात बदल केलेला नाही. वित्त मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. (Investment Scheme)

सध्या सर्वात जास्त व्याज हे सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर दिले जाते. ८.२ टक्के व्याजदर दिले जाे. यातील एक योजना मुलींसाठी तर दुसरी योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेवर ७.७ टक्के व्याजदर दिले जाते.

केंद्र सरकारने ३१ डिसेंबर २०२३ रोजी तिमाहीसाठी काही योजनांमध्ये व्याज वाढवण्याची घोषणा केली होती तरीही आवर्त ठेव वगळल्या कोणत्याही दरात बदल केलेला नव्हता.त्यामुळे आता नागरिकांना बचत योजनेवर तेवढेच व्याजदर मिळणार आहे.

१ वर्षासाठीच्या मुदत ठेव ६.९ टक्के व्याजदर मिळते. २ वर्षाच्या मुदत ठेवीवर ६.९ टक्के व्याजदर दिले जाते. ३ वर्षांच्या मुदत ठेवीसाठी ७ टक्के व्याजदर दिले जाते. ५ वर्षांच्या मुदत ठेवीसाठी ७.५ टक्के व्याजदर दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांसाठी ८.२ टक्के व्याजदर दिले जाते. मासिक उत्पन्न योनेत ७.४ टक्के व्याजदर दिले जाते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेवर ७.७ टक्के व्याजदर दिले जाते.पब्लिक प्रोविडंट फंडमध्ये ७.१ टक्के व्याजदर दिले जाते.किसान विकास पत्र योजनेवर ७.५ टक्के व्याज दिले जाते.सुकन्या समृद्धी योजनेत ८.२ टक्के व्याज दिले जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : 'आईविना जगण किती अवघडं असतं' धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ट्रेलर प्रदर्शित

घरबसल्या अनुभवा ॲक्शनचा धमाका; 'Kanguva' आता ओटीटीवर, कधी अन् कुठे पाहाल

Wedding Rituals Varmala Cermony: लग्नात वर-वधूला वरमाला का घालतात? नेमकं कारण काय, जाणून घ्या...

हे आहेत डोके आणि मानेचे प्रमुख कर्करोग, प्रतिबंधासाठी जीवनशैलीत करा हे बदल...

IND vs AUS: टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट गेला होता हॉस्पिटलमध्ये, सरावावेळी २ फलंदाज जायबंदी

SCROLL FOR NEXT