अर्थसंकल्पात नवीन आयकर विधेयक सादर करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, आता संसदेत निर्मला सितारामन आज नवीन विधेयक संसदेत सादर केले आहे. या नवीन विधेयकात अनेक बदल झालेले आहेत. (New Income Tax Bill)
करदात्यांना समजण्यासाठी सोपी भाषा या नवीन विधेयकात वापरण्यात आली आहे. नवीन विधेयकामुळे आयकर कायदा समजून घेणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे करदात्यांना कोणतीही अडचण येणार नाही.
नवीन आयकर विधेयक हे १९६१ च्या आयकर कायद्याची जागा घेईन.जुन्या आयकर विधेयकात ९११ पाने आहेत. तर नवीन आयकर विधेयकात ६२२ पाने असणार आहेत.नवीन आयकर प्रणालीत कर सवलती नाही तर आयकर कायदा सुलभ करण्यात येणार आहे.
करदात्यांना आयकर कायदा समजण्यासाठी कायद्याची भाषा सोपी केली जाणार आहे. यासाठी बदल करण्यात येणार आहे. जेणेकरुन करदात्यांनी सर्व गोष्टी सहजपणे समजतील. यामध्ये वित्तीय वर्षाऐवजी (Assesment Year) कर वर्ष (Tax year) हा शब्द वापरणार आहे. नवीन विधेयक मान्य झाल्यानंतर ते १ एप्रिल २०२६ पासून लागू करण्यात येईल. (New Income Tax Bill News)
या नवीन विधेयकात करदात्यांच्या सोयीसाठी सोपी भाषा वापरण्यात आली आहे. कर नियम आणि त्यातील कलम सोपे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रत्येक विभागांची संख्या कमी केली आहे. नवीन विधेयकात नवीन कराचा उल्लेख कलेला नाही. नवीन विधेयक ६२२ पानांचे आहे. त्यात ५३६ कलमे आहेत. ६४ वर्षीय जुन्या आयकर कायद्यात बदल करण्यात आले आहे. २०२५ मध्ये नवीन आयकर विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर आयकर कायद्यात रुपांतरित होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.