जुलै महिना सुरू झाली की नोकरी करणारे आणि व्यावसायिक यांची आयकर रिटर्न (ITR) भरण्याची लगबग वाढते. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी आयटीआर भरण्याची शेवटची मुदत ३१ जुलै २०२६ आहे. अनेक करदाते वेळेत आयटीआर भरतात आणि सर्व माहिती अचूक देतात. पण एक महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही की, तुमचा रिफंड अडकू शकतो आणि दंडही भरावा लागू शकतो.
आयटीआर भरल्यानंतर तो व्हेरिफाय करणं खूप गरजेचं असतं. कारण बरेचजण रिटर्न भरल्यानंतर त्याचे ई-व्हेरिफिकेशन करायचं विसरतात. पहिल्यांदाच आयटीआर भरणाऱ्या तरुणांकडून ही चूक जास्त प्रमाणात होते. आयकर कायदा १९६१ नुसार आयटीआर भरल्यानंतर ३० दिवसांच्या आत त्याचे व्हेरिफिकेशन करणं बंधनकारक आहे. ही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने आयटीआर वैध मानला जात नाही.
जोपर्यंत करदाता आपला आयटीआर व्हेरिफाय करत नाही, तोपर्यंत आयकर विभाग रिफंडची प्रक्रिया सुरू करत नाही. त्यामुळे तुमचा रिफंड मिळायला उशीर होऊ शकतो किंवा तो अडकू शकतो. त्यामुळे आयटीआर भरल्यानंतर ई-व्हेरिफिकेशन झालं आहे का, याची खात्री करून घ्या.
जर ३० दिवसांच्या आत व्हेरिफिकेळन झालं नाही, तर आयटीआर अवैध ठरू शकतो. अशा परिस्थितीत आयकर विभागाकडून दंड आणि उशीर झाल्यामुळे फी आकारली जाऊ शकते. वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर ५००० रुपयांपर्यंत दंड लागू शकतो. उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर १००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. तसेच कराची थकबाकी असेल तर त्यावर व्याजही आकारलं जाऊ शकतं. जर वेळेत आयटीआर व्हेरिफाय करणं राहून गेलं असेल, तर शक्य तितक्या लवकर आयकर विभागाशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.