Fastag Saam Tv
बिझनेस

FASTag वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, आरबीआयने लागू केला नवा नियम; तुमचा फायदा होणार की तोटा?

Siddhi Hande

फास्टटॅग युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. आता फास्टटॅगचे पैसे संपल्यावर तुम्हाला रिचार्ज करण्याची गरज पडणार नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने फास्टॅग आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डला ई- मॅडेंट फ्रेमवर्कमध्ये सहभागी केले आहे.

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाअंतर्गत दोन्ही पेमेंट मोडमध्ये रिचार्ज संपला तरीही तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. टोल नाक्यावर तुमचा टोल आपोआप भरला जाईल. म्हणजेच फास्टटॅगमधील पैशांची लिमिट संपल्यावर ग्राहकांच्या खात्यातून पैसे डायरेक्ट फास्टटॅग अकाउंटमध्ये जमा होतील. यामुळे आता तुम्हाला सारखं रिचार्ज करण्याची गरज नाही.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे फास्टटॅग रिचार्ज करण्याचे काम कमी होणार आहे. तुमच्या अकाउंटमध्ये पुरेसे पैसे नसले तरीही टोल नाक्यावर तुम्हाला थांबावे लागणार नाही. तुमच्या फास्टटॅग अकाउंटमध्ये डायरेक्च पैसे ट्रान्सफर केले जातील.

आरबीआयने याबाबत माहिची दिली आहे. फास्टटॅग आणि NCMC अंतर्गत पेमेंट करण्याची कोणतीही मर्यादा नसते. कधीही तुम्हाला पेमेंट करण्याची गरज भासू शकते. अशा वेळी तुम्ही टोलवर वाहन थांबवून फास्टटॅग रिचार्ज करु शकत नाही. त्यामुळे तुमच्या खात्यातील पैशांची मर्यादा संपल्यास तुमच्या खात्यात आपोआप पैसे जमा होतील.

यासाठी युजर्संना प्री-डेबिट नोटिफिकेशची गरज भासणार आहे. याआधी फास्टटॅग अकाउंटमधील पैसे संपण्याआधीच २४ तास अगोदर प्री-डेबिट नोटिफिकेशन पाठवावे लागायचे. परंतु आता हे नोटिफिकेशन पाठवणे गरजेचे आहे. फास्टटॅग आणि NCMC चा वापर खूप वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांना जास्त त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रूपाली चाकणकर यांच्याप्रती केलेली कौतुकाची पोस्ट अजित पवारांनी केली डिलीट

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

SCROLL FOR NEXT