केंद्र सरकारने वाहनधारकांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. सरकारने ३००० रुपयांचा वार्षिक फास्टॅग पास सुरु केला आहे. हा पास काढल्यानंतर तुम्हाला वर्षभर किंवा २०० ट्रीपपर्यंत मोफत प्रवास करता येणार आहे. दरम्यान, हा पास NHAI च्या अंतर्गत येणाऱ्या हायवे आणि एक्सप्रेस वेवर लागू होणार आहे. त्यामुळे हा पास मुंबई पुणे एक्सप्रेस वे समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर लागू होणार नाहीये.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर फास्टॅग पास नाहीच (FASTag Annual Pass Not Activated on Mumbai-Pune Expressway)
रोज लाखो वाहनधारक मुंबई पुणे एक्सप्रेस वे, अटल सेतू अन् समृद्धी महामार्गावरुन प्रवास करतात. या महामार्गावर प्रवास करताना शेकडो रुपयांचा टोल भरावा लागतो. जेव्हा फास्टॅग पासची घोषणा झाली तेव्हा या वाहनधारकांना दिलासा मिळण्याची आशा होती. परंतु आता समृद्धी महामार्ग,मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ही फास्टॅग सेवा उपलब्ध नाही.
या तिन्ही मार्गावर तुम्हाला फास्टॅग रिचार्ज करुन वापरावा लागणार आहे. त्यामुळे रोज मुंबई-पुणे अप डाउन करणाऱ्या वाहनधारकांना या पासचा फायदा होणार नाहीये.
हा फास्टॅग पास फक्त नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (NHAI)अंतर्गत येणाऱ्या महामार्गावर लागू होणार आहे. राज्य सरकारअंतर्गत येणाऱ्या हायवे किंवा एक्सप्रेस वेवर तुम्हाला हा पास वापरता येणार नाहीये. महाराष्ट्रातील ८७ पैकी फक्त १८ टोल प्लाझावर हा फास्टॅग पास लागू असणार आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील वाहनधारकांना जास्त प्रमाणात दिलासा मिळालेला नाही.
FASTag पास कुठे मिळवायचा? (FASTag Pass Toll Activation)
फास्टॅग पास हा तुम्ही ऑनलाइन काढू शकतात. राजमार्ग यात्रा दूत अॅपवर जाऊन अप्लाय करु शकतात. यावर जाऊन तुम्हाला पाससाठी अप्लाय करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर त्या दिवसापासून पुढील १ वर्षासाठी तुम्हाला पास वापरता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.