FASTag  Saam tv news
बिझनेस

FASTag Annual Pass: फास्टॅगचा वार्षिक पास कसा काढायचा? स्टेप बाय स्टेप प्रोसेस करा फॉलो

Annual FASTag Activation Step By Step Process: फास्टॅगचा ३००० रुपयांचा पास सुरु झाला आहे. आता हा पास तुम्हाला ऑनलाइन काढता येणार आहे. त्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा.

Siddhi Hande

फास्टॅगचा वार्षिक पास आजपासून वाहनधारकांना मिळणार आहे. हा फास्टॅगचा वार्षिक पास ३००० रुपयांचा असणार आहे. हा पास तयार करण्यासाठी लिंकदेखील अॅक्टिव्ह झाली आहे. तुम्ही मोबाईलद्वारे अवघ्या काही मिनिटांत हा फास्टॅग पास बनवू शकतात. कालच्या एका दिवसात २० हजारांपेक्षा जास्त वाहनधारकांनी हा पास बनवलादेखील आहे. हा पास कुठे आणि कसा बनवायची त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या. (FASTag Annual Pass News)

NHAI चा वार्षिक फास्टॅग पास काय आहे? (What Is Annual FASTag Pass)

फास्टॅगचा हा वार्षिक पास असणार आहे. हा पास तुम्हाला वर्षभर वापरता येणार आहे.किंवा २०० ट्रीपपर्यंत तुम्ही हा फास्टॅग पास वापरु शकतात. म्हणजेच तुम्हाला एका टोलमागे फक्त १५ रुपये द्यावे लागणार आहे.

हा फास्टॅग वार्षिक पास १००० पेक्षा जास्त टोल प्लाझावर आणि नॅशनल एक्सप्रेसवरील टोल प्लाझावर वॅलिड असणार आहे. आता तुम्हाला ऑनलाइन अॅपवरुन किंवा वेबसाइटवरुन हा फास्टॅग पास काढता येणार आहे.

फास्टॅग पास काढण्याची प्रोसेस (FASTag Annual Pass Online Process)

  • सर्वात आधी तुम्हाला rajmargyatra मोबाईल अॅप डाउनलोड करा.

  • यानंतर अॅपवर तुम्हाला Annual Pass चा ऑप्शन दिसेल.

  • यानंतर माय बुकिंगवर क्लिक करा. त्यानंतर Pre Book ऑप्शन निवडा.

  • यानंतर तुम्ही स्क्रिनवर दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

  • यांनतर गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर टाका. यानंतर तुमच्या फोनवर ओटीपी येईल.

  • यानंतर तुम्हाला ३००० रुपये देण्याचा ऑप्शन दिसेल.

  • यानंतर नेट बँकिंग, यूपीआय किंवा कार्डद्वारे पेमेंट करा.

  • तुमचे पेमेंट पूर्ण झाल्यावर लगेचच तुमच्या फोनवर वार्षिक टोल पास उपलब्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway News : प्रवाशांसाठी मोठी बातमी! तत्काळ तिकीट बुकिंगसाठी लागणार 'ओटीपी' ; काय आहे रेल्वेचा नियम? वाचा

Shepu Mungdaal Recipe : घराघरात बनणारी स्वादिष्ट शेपू मूगडाळीची भाजी, एकदा करुनच बघा

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

लग्नात 'रसगुल्ले' संपले अन् महाभारत सुरू झालं, वधू-वर पक्षात तुफान राडा; ताटं, खुर्च्या फेकून मारल्या, VIDEO व्हायरल

DRDO Internship: कोणतीही परीक्षा नाही; डीआरडीओमध्ये इंटर्नशिपची संधी; अर्ज कसा कराल?

SCROLL FOR NEXT