FAStag Annual Pass Saam Tv
बिझनेस

FASTag Annual Pass : फास्टॅग वार्षिक पास या हायवे अन् एक्सप्रेसवर लागू नाही, कारण काय? वाचा सविस्तर

FASTag Annual Pass Not Valid On These Highway: ३००० रुपयांचा फास्टॅग पास सुरु झाला आहे. हा फास्टॅग पास काही हायवे आणि एक्सप्रेस वेवर लागू होणार नाहीये. यामागचे कारण वाचा सविस्तर.

Siddhi Hande

३००० रुपयांचा वार्षिक फास्टॅग पास सुरु

या एक्सप्रेस वे आणि हायवेवर होणार नाही लागू

कोणत्या महामार्गांवर आणि का लागू होणार नाही फास्टॅग पास

केंद्र सरकारने वाहनधारकांसाठी फास्टॅग वार्षिक पास लाँच केला आहे. हा पास १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरु झाला आहे. नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाकडून हा पास देण्यात आला आहे. हा पास फक्त नॅशनल हायवे आणि एक्सप्रेस वेसाठी आहे. जे हायवे किंवा नॅशनल एक्सप्रेस वे हे नॅशनल ऑथोरिटी ऑफ इंडियाअंतर्गत येतात त्यांना या फास्टॅग पासचा लाभ घेता येणार आहे.

फास्टॅग पासमुळे तुम्ही फक्त ३००० रुपयांत वर्षभर मोफत प्रवास करु शकतात. २०० ट्रीपसाठी हा पास असणार आहे. आतापर्यंत लाखो वाहनधारकांनी हा पास घेतला आहे. परंतु हा पास सर्व हायवे किंवा एक्सप्रेस वेसाठी लागू होणार नाही. राज्य शासनाअंतर्गत येणाऱ्या अनेक महामार्गावर हा पास लागू होणार नाहीये.

या महामार्गावर आणि एक्सप्रेस वेवर फास्टॅग पास लागू नाही

फास्टॅग पास हा NHAI आणि केंद्र सरकारअंतर्गत येणाऱ्या टोल प्लाझावर लागू होणार आहे.राज्य सरकारअंतर्गत येणाऱ्या आणि लोकल टोल प्लाझासाठी हा पास लागू होणार नाहीये.

समृद्धी महामार्ग

मुंबई पुणे एक्सप्रेस वे

अटल सेतू

यमुना एक्सप्रेस वे(उत्तर प्रदेश)

पुर्वांचल एक्सप्रेस(उत्तर प्रदेश)

बुंदेलखंड एक्सप्रेस वे (उत्तर प्रदेश)

आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वे (उत्तर प्रदेश)

या हायवे आणि एक्सप्रेस वेसोबत इतर राज्यांच्या अंतर्गत येणाऱ्या एक्सप्रेस वे आणि लोकल टोल प्लाझावर हा पास लागू होणार नाहीये. यासाठी तुम्हाला फास्टॅग वापरावा लागणार आहे.

या मार्गांवर फास्टॅग पास का लागू होणार नाही? (Why FASTag Pass Not Valid On These Highway Or Expressway)

फक्त केंद्र सरकार आणि नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाअंतर्गत येणाऱ्या महामार्गावर हा पास लागू होणार आहे. राज्य सरकार अंतर्गत येणाऱ्या हायवे किंवा एक्सप्रेस वेवर हा पास लागू होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holidays List 2025: देशभरातील बँकांना आठवडाभरात बंपर सुट्ट्या; जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Maharashtra Live News Update: : वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी मोठी अपडेट; हगवणे कुटुंबांतील सदस्यांचा जामीन फेटाळला

Crime : कौटुंबिक वाद टोकाला पोहोचला, सावत्र मुलीसमोर नवऱ्याचं बायकोसोबत भयंकर कृत्य; बस स्टँडवर काय घडलं?

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंचं ठरलं! दिवाळीत युती; दोन फॉर्म्युल्यावर चर्चा, कोणत्या भावाला किती जागा मिळणार?

Chanakya Niti: आयुष्यभर तुमच्यावर पडेल पैशाचा पाऊस, फक्त या ७ गोष्टी फॉलो करा! चाणक्य निती काय सांगते?

SCROLL FOR NEXT