या व्हिडिओमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बोलताना दिसतायत.व्हिडिओमध्ये त्या सांगत आहेत की, दिवसाला 21 हजार रुपयांच्या गुंतवणुकीमुळे महिन्याला 15 ते 20 लाख रुपये मिळतील.चांगला परतावा मिळेल असं अर्थमंत्री सांगतायत.केंद्रीय मंत्रीच हे सांगत असल्याने खरंच सरकारची लखपती योजना आहे का...? आणि या योजनेत पैसे कसे गुंतवायचे...? असे सवाल उपस्थित होतायत
हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय.त्यामुळे अनेकांचा विश्वास बसलाय.काहींनी तर अॅपच्या द्वारे पैसेही गुंतवलेयत.मात्र, खरंच सरकारची अशी कोणती योजना आहे का...? 21 हजार गुंतवल्यानंतर महिन्याला तब्बल 11 ते 15 लाख मिळू शकतात का...? अशी कोणती योजना आहे...? 21 हजार गुंतवून एवढे पैसे कसे काय मिळतायत असेही अनेकांना प्रश्न पडलेयत.त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने या व्हिडिओची पडताळणी सुरू केली.त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
हैदराबादमध्ये एका व्यक्तीची 20 लाखांची फसवणूक झाली..हा सर्व घोटाळा आहे.हे व्हिडिओ डिजिटल पद्धतीने बदलण्यात आलेयत.पैशांच्या आमिषाला बळी पडू नका.सावधगिरी बाळगा.कारण, पैसे देण्याचं लालच दाखवून फसवणूक केली जातेय.देशभरात अशा प्रकारे अनेक लोकांची फसवणूक झालीय.त्यामुळे आमच्या पडताळणीत सरकारची लखपती योजना आल्याचा दावा असत्य ठरलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.