Facebook Instagram Down Saam Tv
बिझनेस

Facebook Instagram Down: फेसबुक आणि इन्स्टाग्राम अचानक ठप्प; जगभरातील करोडो नेटकऱ्यांना मोठा फटका

Facebook Instagram Down: फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या सेवेत अचानक बिघाड झाल्याने जगभरातील नेटकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. लॉगिन, फीड आणि मेसेजिंग सेवा प्रभावित झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या.

Shruti Vilas Kadam

Facebook Instagram Down: जगभरातील नेटकऱ्यांसाठी चिंचेची बातमी समोर आली आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्राम सेवा शुक्रवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास अचानक ठप्प झाले आहे. या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सेवेत शुक्रवारी अचानक बिघाड झाल्याने जगभरातील करोडो नेटकरी चिंतेत आले आहेत. जगभरातील नेटकरी लॉगिन, फीड रिफ्रेश, मेसेजिंग आणि अॅप वापरण्यासंबंधी समस्या येत असल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत.

सोशल मीडिया सेवा खंडित झाल्यानंतर नेटकऱ्यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर), रेडिट आणि इतर प्लॅटफॉर्मवर आपल्या समस्या मांडण्यास सुरुवात केली. काही नेटकऱ्यांनी फेसबुक अकाउंटमधून अचानक लॉगआउट करण्यात आल्याचे दिसून आले, तर अनेकांना इन्स्टाग्रामवरील पोस्ट, रील्स आणि मेसेजेस लोड होत नसल्याचा अनुभव आला.

आउटेज ट्रॅकिंग करणाऱ्या विविध संकेतस्थळांवरही तक्रारींचा मोठा भडिमार झाला. अनेक नेटकऱ्यांनी अॅप सुरू न होणे, फीड अपडेट न होणे आणि मेसेंजर सेवा विस्कळीत झाल्याची माहिती दिली. काहींना "Account Unavailable" किंवा एरर येत असल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. दिसल्याचेही समोर आले आहे.

या तांत्रिक बिघाडामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली. काही नेटकऱ्यांनी हा बिघाड जागतिक स्तरावरील सर्व्हर समस्येमुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला. मात्र, याबाबत मेटाकडून अजून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नव्हते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT