Gautam Adani Group Share Market Saam Tv
बिझनेस

Explainer: अदानींच्या संपत्तीत गेल्या 8 दिवसात आश्चर्यकारक वाढ, यामागचं नेमकं कारण काय?

Adani Group Shares: अदानींच्या संपत्तीत गेल्या 8 दिवसात आश्चर्यकारक वाढ, यामागचं नेमकं कारण काय?

Satish Kengar

Gautam Adani Group Share Market: 

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी आली आहे. अदानी समूहाच्या शेअर्सने बाजाराला नव्या उंचीवर नेले आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्सच्या किमती प्रचंड घसरल्या आणि त्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागला. अदानींचे शेअर्स इतक्या लवकर आणि इतक्या वेगाने वाढू लागतील, अशी अपेक्षाही अनेकांनी केली नसेल. अदानी समुहाचे शेअर्स बुधवारी आणि आजही तेजीत आहेत.

अदानी समूहाचे शेअर्स रॉकेटच्या वेगाने वाढत असल्याचे बोलले जात आहे. बाजारात तेजी असताना अदानी समूहाच्या शेअर्सच्या किमती वाढल्याने गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. यासह गौतम अदानी संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानींच्या जवळ आले आहेत आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टॉप 15 मध्येही आले आहेत. लवकरच ते टॉप 10 मध्ये देखील येऊ शकतात, असं बोललं जात आहे. यातच अदानी समूहाचे शेअर्स एवढ्या वेगाने झेप घेण्याचे कारण काय? हेच आपण जाणून घेणार आहोत.

जानेवारीमध्ये शेअर्सच्या किमतीत झाली होती मोठी घसरण

अदानी यांच्या संपत्तीत एका दिवसात 12.3 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. सध्या, अदानी यांची एकूण संपत्ती सुमारे 80 अब्ज डॉलर्स आहे. यापूर्वी, जेव्हा अदानी जगातील पहिल्या 5 श्रीमंतांमध्ये समाविष्ट होते, तेव्हा त्यांची एकूण संपत्ती 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होती. सध्या मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 91.4 अब्ज डॉलर्स आहे. जानेवारी 2023 मध्ये अदानी यांच्या एका शेअरची किंमत सुमारे 3800 रुपये होती. (Latest Marathi News)

हिंडेनबर्गच्या अहवालाने बसला धक्का

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर ते प्रति शेअर रु 1000 पर्यंत खाली आले. हा अदानी समूहाला मोठा धक्का होता. अदानी समूहाच्या एकूण 10 सूचिबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती 69 अब्ज डॉलरने कमी झाली होती. यामुळे ते जगातील टॉप 3 लोकांच्या यादीतून बाहेर पडले. त्यांचा टॉप 30 मध्येही समवेश नव्हता.

शेअर्समध्ये तेजी कशामुळे आली?

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये ही सर्व वाढ सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर झाली आहे. सेबीने न्यायालयाला सांगितले की, त्यांनी अदानी समूहावरील हिंडेनबर्ग अहवालाची चौकशी पूर्ण केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हिंडेनबर्गचा अहवाल वस्तुस्थितीनुसार योग्य मानण्याची गरज नाही, असे म्हटले होते. या प्रकरणी सेबीवर शंका घेतली जाऊ शकत नाही. न्यायालयाच्या सकारात्मक टिप्पणीनंतर समूहाच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे. निवडणूक निकालानंतरही शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT