Electric Scooter Under 60000 Saam Tv
बिझनेस

90 KM ची रेंज आणि 55799 रुपये किंमत, पुरुषांसह महिलांसाठी बेस्ट आहे 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर

Electric Scooter Under 60000: Evolet Pony इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी क्षमता 250 डब्ल्यू इतकी आहे आणि याच्या सीटची उंची 800 मिमी आहे. ज्यामुळे कमी उंचीच्या लोकांसाठी देखील ही स्कूटर चालवणे सोपे होते.

Satish Kengar

बाजारात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरला मोठी मागणी आहे. या सेगमेंटमध्ये कमी स्पीड 250 W बॅटरी असलेल्या स्कूटर येतात, ज्यांना चालवण्यासाठी कोणत्याही ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नसते आणि पोलीस हेल्मेटशिवाय ही स्कूटर चालवल्याबद्दल चालान कापू शकत नाही.

बाजारात जाणं, मुलांना शाळेत सोडणे, इत्यादी घरातील दैनंदिन कामे करण्यासाठी ही बेस्ट स्कूटर आहे. Evolet Pony ही या सेगमेंटची स्कूटर आहे. या स्कूटरची किंमत 55,799 रुपये आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 90 किलोमीटरपर्यंतची रेंज देईल, असा कंपनीचा दावा आहे.

Evolet Pony इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी क्षमता 250 डब्ल्यू इतकी आहे आणि याच्या सीटची उंची 800 मिमी आहे. ज्यामुळे कमी उंचीच्या लोकांसाठी देखील ही स्कूटर चालवणे सोपे होते. मोबाईल चार्ज करण्यासाठी यात USB चार्जिंग पोर्ट देखील देण्यात आला आहे. पोनीमध्ये 48 V/24Ah बॅटरी पॅक आहे. या स्कूटरची टॉप स्पीड 25 किमी प्रतितास आहे.

Pony एक हलक्या वजनाची स्कूटर आहे, तिचे एकूण वजन 76 किलो आहे. ज्यामुळे रस्त्यावर नियंत्रण करणे सोपे होते. या स्कूटरला पूर्ण चार्ज होण्यासाठी चार तास लागतात. यात फास्ट चार्जिंगचा पर्यायही उपलब्ध आहे.

PURE EV EPluto 7G

Evolet Pony बाजारात PURE EV EPluto 7G स्कूटरशी स्पर्धा करते. ही स्कूटर 77999 रुपये एक्स-शोरूमच्या प्रांभिक किमतीत उपलब्ध आहे. ही नवीन पिढीची स्कूटर आहे. याचा टॉप स्पीड 47 किमी प्रतितास इतका आहे. याचे वजन 76 किलो आहे आणि 4 तासात पूर्ण चार्ज होते. स्कूटरमध्ये 1200 W ची हाय पॉवर बॅटरी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pet Dogs: पाळीव कुत्र्यांना ट्रेनिंग कसे द्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: 'आता तुम्हाला अखेरची संधी' वादग्रस्त मंत्र्यांवर फडणवीसांची नाराजी

Maharashtra Live News Update: आदिवासी आश्रमशाळेत पाण्याची टाकी कोसळून एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Horoscope Wednesday : 'या' क्षेत्रात नोकरी करण्याऱ्यांची चांदीच चांदी, काहींच्या कटकटी होतील दूर, वाचा राशीभविष्य

PM Modi: अमेरिकेतून रात्रीच्यावेळी कॉल आला अन्...; PM मोदींनी लोकसभेत सांगितली Operation Sindoor ची कहाणी

SCROLL FOR NEXT