मराठी वाचकांचे विश्वासार्ह व्यासपीठ असलेल्या ई-सकाळ डॉट कॉमने कॉमस्कोअर क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. कॉमस्कोअरच्या ताज्या अहवालानुसार, ई-सकाळ ही भारतातील सर्वाधिक वाचली जाणारी मराठी न्यूज वेबसाइट बनली आहे. eSakal च्या संकेतस्थळावर ब्रेकिंग न्यूज, ताज्या बातम्या, व्हिडिओ आणि सखोल विश्लेषण उपलब्ध आहेत. त्याशिवाय स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांसह क्रीडा, मनोरंजन, तंत्रज्ञान आणि लाईफस्टाईल या बातम्यांवरही विशेष भर दिला जातोय.
कॉमस्कोर हा जागतिक पातळीवर डिजिटल मीडिया विश्लेषण करणारा प्लॅटफॉर्म म्हणून ओळख आहे. कॉमस्कोरच्या ताज्या अहवालानुसार 'ई-सकाळ' ने मराठी वाचकांचा विश्वास संपादन केला आहे. ते अव्वल स्थानावर पोहचले आहे. कॉमस्कोरच्या मे २०२५ च्या आकडेवारीनुसार, ई सकाळ. कॉमला १.६५ कोटी युनिक व्हिजिटर्स मिळाले आहेत. इतर संकेतस्थळाच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे, त्यामुळे सकाळ मराठी न्यूज वेबसाईटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचलेय. 'ई-सकाळ' महाराष्ट्रासहित जगभरात सर्वाधिक वाचले जाणारं मराठी संकेतस्थळ आहे. तंत्रज्ञान अन् नव्या माध्यमांचा योग्य वापर करत, ई-सकाळनं हे यश गाठलं आहे.
डिजिटल मीडियात सर्वाधिक वाचले जाणारे संकेतस्थळ म्हणून ई सकाळ. कॉमने पहिल्या क्रमांकावर भरारी घेतली. सकाळ डिजिटलला मिळालेले यश फक्त आकडेवारीपुरतेच नाही. तर वाचकांची पसंती अन् विश्वास आहे. सकाळच्या बातम्यांची गुणवत्ता आणि नवीन डिजिटल विचारांचा हा परिणाम आहे. ईसकाळ. कॉमनं विश्वासार्ह, महत्त्वाच्या आणि वाचकांना आवडणार्या बातम्यांच्या जोरावर अव्वल स्थान पटकावले आहे.
ई-सकाळ स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांवर निष्पक्ष आणि सखोल अहवाल प्रदान करते, ज्यामुळे वाचकांचा विश्वास संपादन झाला आहे. मोबाइल अॅप, यूट्यूब आणि सोशल मीडियाद्वारे ताज्या बातम्या आणि व्हिडिओ त्वरित पोहोचवून ई-सकाळने डिजिटल क्षेत्रात अव्वल स्थान पटकावले आहे. बातम्यांबरोबरच क्रीडा, मनोरंजन, जीवनशैली, तंत्रज्ञान आणि शेतीसारख्या विविध विषयांवरील वैविध्यपूर्ण सामग्रीमुळे सर्व वयोगटातील वाचकांना ईसकाळ आकर्षित करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.