EPFO New Update 
बिझनेस

EPFO च्या सर्व्हिसमध्ये मोठा बदल; कसा कराल पीएफचं ट्रान्सफर अन् बॅलन्स चेक?

EPFO New Update: सेवा सुधारण्यासाठी ईपीएफओ अनेक बदल करत असते. आता बॅलन्स चेक, पीएफ ट्रान्सफर आणि पेन्शनशी संबंधित कोणतेही काम सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकतात.

Bharat Jadhav

अनेकवेळा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) च्या पोर्टलवरील सेवा मंदावल्यामुळे खात्याशी संबंधित कोणतेही काम करण्यात अडचणी येतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी EPFO ​​ने काही बदल केलेत. याच्या मदतीने आता तुम्ही तुमचा बॅलन्स तपासू शकाल आणि एकाच वेळी PF चे पैसे काढू शकाल. आता करण्यात आलेल्या नवीन सुधारणांमध्ये प्रोफाइल अपडेट, पीएफ खाते हस्तांतरण आणि पेन्शन पेमेंट सिस्टम सुलभ करणे या कामांचा समावेश आहे.

तुम्ही एसएमएस आणि मिस्ड कॉलद्वारे तुमच्या खात्यातील शिल्लक देखील तपासू शकता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) देशातील ७ कोटींहून अधिक संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिलासा दिलाय. कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक मोठ्या सुधारणांची घोषणा करण्यात आली आहे. या सुधारणामुळे पारदर्शकता वाढवून आणि प्रक्रिया जलद बनणार आहे. तसेच डिजिटल सेवा सुलभ केली जाणार आहे.

बॅलन्सचं चेक करण्याची सोपी पद्धत

ज्यांचे UAN सक्रिय आहे आणि आधार, पॅन आणि बँक तपशीलांशी जोडलेले आहे, ते सहजपणे शिल्लक तपासू शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून 7738299899 वर मेसेज पाठवावा लागेल. ही सेवा इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि बंगालीसह 10 भाषांमध्ये दिली जात आहे. यात तुम्हाला तुमच्या पसंतीच्या भाषेसाठी एक कोड द्यावा लागेल, उदाहरणार्थ, तुम्ही हिंदीसाठी HIN किंवा तमिळसाठी TAM लिहू शकता.

मिस्ड कॉल सर्विस

मिस्ड कॉल सेवा घ्यायची असेल तर त्यासाठी UAN सक्रिय असणे आवश्यक असतं. KYC अपडेट करणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल देऊ शकता. दोन रिंग वाजल्यानंतर कॉल आपोआप डिस्कनेक्ट होईल आणि तुम्हाला तुमचा पीएफ बॅलन्स एसएमएसच्या स्वरूपात मिळेल.

प्रोफाइल अपडेट करणं

ईपीएफओच्या सेवांमध्ये केलेल्या बदलामुळे प्रोफाइल अपडेट करण्याची प्रक्रियाही खूप सोपी करण्यात आली आहे. ज्या सदस्यांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आधारशी लिंक आहे ते त्यांचे नाव, जन्मतारीख आणि राष्ट्रीयत्व यासारखे वैयक्तिक तपशील ऑनलाइन अपडेट करू शकणार आहेत. यामुळे प्रशासनावरील भारही बऱ्याच प्रमाणात कमी होईल. आतापर्यंत अपडेट्ससाठी नियोक्त्याची परवानगी आवश्यक होती.

खातं ट्रान्सफर कसं करायचं?

तुमचे खाते आता ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही EPFO ​​वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. १५ जानेवारी २०२५ पासून बहुतेक प्रकरणांमध्ये नियोक्त्याची परवानगी आवश्यक राहणार नाहीये. यामुळे पीएफचे पैसे नवीन खात्यात ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया जलद होईल. ईपीएफओचे सदस्य बऱ्याच काळापासून या बदलाची मागणी करत होते. याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांसमोरील दीर्घकाळापासूनचे आव्हान देखील कमी झाले.

पेन्शन पेमेंट सिस्टम

सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम (CPPS) ची सुरुवात ही ईपीएफओमधील एक मोठी सुधारणा आहे. सीपीपीएस नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) प्लॅटफॉर्मद्वारे थेट बँक खात्यांमध्ये पेन्शन पेमेंट करण्याची सुविधा देत असते. आधी पेन्शन पेमेंटसाठी प्रादेशिक कार्यालयांमध्ये पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) हस्तांतरित करणे आवश्यक होतं. यामुळे सदस्याला पेन्शनचे पैसे मिळण्यास विलंब होत असायचा. आता नवीन प्रणालीमुळे हा विलंब दूर झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT