EPFO Investment Rules May Change Saam Tv
बिझनेस

EPFO Update: ३० कोटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

EPFO Investment Rules May Change: ईपीएफओ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ईपीएफओ वार्षिक ठेवींपैकी ३ टक्के रक्कम गुंतवणूक करणार आहे. याबाबत प्रस्ताव तयार केला आहे.

Priya More
  • ईपीएफओ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे

  • ईपीएफओच्या नवीन गुंतवणूक प्रस्तावाबाबत माहिती समोर आली आहे

  • ईपीएफओ वार्षिक ठेवींपैकी ३ टक्के रक्कम गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले जात आहे

ईपीएफओसंदर्भात एक महत्वाची बातमी आहे. ईपीएफओचे सदस्य असलेल्या ३० कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांची बचत आता स्टार्टअप्स आणि प्रायव्हेट इक्विटीसारख्या गुंतवणूक पर्यायांशी जोडली जाण्याची शक्यता आहे. ईपीएफओ अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड्स म्हणजे एआयएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करत आहे. याद्वारे दरवर्षी मिळणाऱ्या नवीन ठेवींपैकी ३ टक्क्यांपर्यंत रक्कम निवडक एआयएफमध्ये गुंतवण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. पण या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, सेबीच्या गुंतवणूक समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली होती. ईपीएफओ ३० कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी अंदाजे ३० लाख कोटी रुपयांच्या सेवानिवृत्ती बचतीचे व्यवस्थापन करते. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर ईपीएफओच्या गुंतवणूक धोरणात मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतो. यामुळे जे स्टार्टअप्स आहेत त्यांना आणि इतर वाढत्या व्यवसायांना भांडवल मिळवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

हा प्रस्ताव नोव्हेंबरमध्ये केंद्रीय विश्वस्त मंडळासमोर सादर केला जाण्याची शक्यता आहे. या मंडळाचे अध्यक्ष केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया आहेत. केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या मंजुरीनंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल. या बैठकीतच याबाबत पुढील पावले उचलली जातील. या निर्णयाचा उद्देश ईपीएफओच्या गुंतवणुकीची व्याप्ती वाढवणे हा आहे. आतापर्यंत ईपीएफओने सरकारी रोखे, बॉण्ड्स आणि इतर पारंपरिक गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक केली आहे. या नवीन प्रस्तावामुळे त्यांना स्टार्टअप्स आणि वेगाने वाढणाऱ्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करणं शक्य होणार आहे.

ईपीएफओ कोणत्या फंडांमध्ये गुंतवणूक करू शकते याबाबत देखील माहिती समोर आली आहे. या प्रस्तावानुसार, ईपीएफओ सेबीकडे नोंदणीकृत असलेल्या श्रेणी-१ आणि श्रेणी-२ पर्यायी गुंतवणूक निधींमध्ये गुंतवणूक करू शकते. श्रेणी-१ एआयएफ हे फंड स्टार्टअप्स, छोटे व्यवसाय, पायाभूत सुविधा आणि व्हेंचर कॅपिटल यांसारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करतात. तर श्रेणी-२ एआयएफ यामध्ये प्रायव्हेट इक्विटी, रिअल इस्टेट आणि प्रायव्हेट डेट यांसारख्या क्षेत्रात गुंतवणूक करू शकतात.

याद्वारे ईपीएफओला पारंपरिक गुंतवणुकींव्यतिरिक्त इतर क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. या गुंतवणुकींमध्येही जोखीम असते आणि परताव्याची हमी दिली जात नाही. पण प्रस्तावित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अनेक अटींचा समावेश आहे. एआयएफच्या निधीचा आकार किमान १०० कोटी रुपये असावा. कोणत्याही एका फंडामधील गुंतवणुकीची मर्यादा निश्चित केली जाईल. परदेशात नोंदणीकृत कंपन्यांमधील गुंतवणुकीवर निर्बंध असणार आहे. त्याचसोबत निधी व्यवस्थापकाचे स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी नियम बनवले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, ११ आरोपीना आज कोर्टात हजर करण्यात आले

Kurti Designs For Women: महिलांसाठी कुर्तीच्या लेटेस्ट 7 डिझाइन्स, डेलीवेअर आणि ऑफिससाठी ठरतील बेस्ट

Sleep Health : काही केल्या झोपच लागत नाही? या ७ गोष्टी करा, मनातलं तुफान शांत होईल

Diwali Utne : अभ्यंगस्नान करताना उटणे तेलातून लावावे की दुधातून, काय आहे फायदेशीर

गुड न्यूज! सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर

SCROLL FOR NEXT