EPFO-UAN KYC Process google
बिझनेस

EPFO News: क्या बात! EPFOची केवायसी करणं झालं सोपं, क्लेमशिवाय मिळणार रक्कम

EPFO-UAN KYC Process: ईपीएफओ खातेदारांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर एम्पलॉयच्या मंजुरीची आवश्यकता असते. येत्या काळात त्याची आवश्यकता राहणार नाहीये.

Bharat Jadhav

ईपीएफओच्या 8 कोटी सक्रीय खातेदारांसाठी मोठी बातमी आहे. जून 2025 पासून खातेदारांसाठी स्वंयघोषणापत्र सेवा सुरू केली जाणार आहे. यात सेल्फ अटेस्टेशन सुविधा उपलब्ध झाल्यानंतर KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मंजुरी घेणं आवश्यक राहणार नाहीये.

केवायसी करणं होणार सोपं

ईपीएफओची केवायसी प्रक्रिया सोपी होणार आहे. दरम्यान केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कंपनीची मंजुरी आवश्यक असते. एम्पलॉयलरनं मंजुरी दिल्यानंतर केवायसी प्रक्रिया पूर्ण होत असते. दरम्यान ईपीएफओकडून 3.0 अंतर्गत सेल्फ अटेस्टेशन फॅसिलिट सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर केवयासी प्रक्रिया पूर्ण करणं सोपं होणार आहे. नवी प्रक्रिया सुरू झाल्यास केवायसी पूर्ण करण्यासाठी वेळ कमी लागेल.

काही वेळा कंपन्या बंद झाल्यानं खातेदारांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. यामुळं ईपीएफचे क्लेम फेटाळले जातात. पण नव्या सुविधेमुळे केवायसीसाठी वेळ तर कमी लागेलच पण क्लेम ही होईल. श्रम आणि रोजगार मंत्रालय 2025 च्या अखेरपर्यंत ईपीएफओ 3.0 लाँच गेलं जाणार आहे. ईपीएफओ 3.0 मध्ये बँकांसोबत मिळून एक सुविधा तयार करण्याचा विचार केला जातोय. यात ईपीएफ सबस्क्रायबर्स एका मर्यादेपर्यंत त्यांच्या कॉरपसमधून फंड काढू शकतात. साधारणपणे ही रक्कम 50 टक्क्यांपर्यंत असू शकते. यासाठी ईपीएफओकडे क्लेम करण्याची आवश्यकता नसणार आहे.

तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत युनिव्हर्सल अॅक्टिव्हेशन नंबर सक्रिय करण्याची अंतिम मुदत 15 जानेवारीपर्यंतच आहे. याआधी UAN नंबर सक्रिय करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 होती. त्यानंतर आता ही मुदत 15 जानेवारी 2025 पर्यंत वाढवण्यात आली. कर्मचाऱ्यांला एमप्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला UAN नंबर सक्रिय करणे गरजेचे आहे.

युनिव्हर्सल अॅक्टिव्हेशन नंबर हा भविष्य निर्वाह निधी खाती मॅनेज करण्यासाठी वापरला जातो. हा १२ अंकी युनिक नंबर आहे. कर्मचाऱ्यांचे व्यव्हार सुलभ करण्यासाठी आणि बॅलेंसची माहिती मिळवण्यासाठी हे चांगले अॅप आहे. पीएफ अकाउंटमध्ये जमा होणारी रक्कम ही एक गुंतवणूक असते. EPFO हे तुमचे पीएफ अकाउंट मॅनेज करते. या अकाउंटमध्ये तुमचे आतापर्यंत किती पैसे जमा झाले हे तुम्ही घरबसल्या चेक करू शकतात.

सर्वप्रथम EPFO पोर्टला जा.

त्यानंतर Our Services सेक्शनमध्ये जावे. त्यानंतर For Employees वर क्लिक करा.

यानंतर पासबुक या ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर तुमचा यूएएन नंबर आणि पासवर्ड टाका. त्यानंतर तुमचा बॅलन्स दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

SCROLL FOR NEXT