EPFO  Saam Tv
बिझनेस

EPFO चा मोठा निर्णय! नोकरी बदलल्यानंतर पीएफ आणि विमा नियमात बदल; वाचा सविस्तर...

EPFO Rule Change: ईपीएफओच्या नियमात बदल झाले आहे. आता जर नोकरी सोडल्यानंतर नवीन नोकरी जॉइन करेपर्यंत ६० दिवसांचा कालावधी असेल तर त्याला सर्व्हिस ब्रेक म्हणून मानले जाणार नाही.

Siddhi Hande

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला पैसे जमा केले जातात. दरम्यान, नोकरी बदलल्यानंतर पीएफ अकाउंट ट्रान्सफर करावे लागते. नोकरी बदलल्यानंतर तुमचे पीएफ किंवा सर्व्हिस रेकॉर्ड किंवा विम्यावर परिणाम होणार, असं अनेकांना वाटते. दरम्यान, आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ईपीएओने नियमात बदल केले आहेत. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

ईपीएफओने नोकरी बदलल्यानंतर आणि एम्प्लॉयी डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीमच्या नियमात बदल केले आहे. यामध्ये दर तुम्ही नोकरी बदलली आणि त्यामध्ये ६० दिवसांचा म्हणजे दोन महिन्यांचा कालावधी असेल तर त्याला ब्रेक मानले जात नाही.

विमा घेणाऱ्यांनाही दिलासा

या बदलाचा थेट परिणाम विमा लाभावरदेखील होणार आहे. नवीन नियमानुसार, जर ईपीएफओ सदस्याचा मृत्यू शेवटचे पीएफ योगदान दिल्यानंतर ६० वर्षांच्या आत झाला तर कंपनीच्या रेकॉर्डमध्ये कर्मचारी म्हणून माहिती रजिस्टर केली जाते. यामुळे त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला वीमा योजनेचा लाभ मिळणार आहे.

वीक्रेंड ब्रेक

नोकरी बदलतानाच्या पीरियडमध्ये शनिवार, रविवार सर्व्हिस ब्रेक म्हणून मानला जाणार नाही. जर एखाद्या कर्मचाऱ्या शुक्रवारी कंपनी सोडली आणि वीकेंडनंतर नवीन नोकरी जॉइन केली तर तो कालावधी ब्रेक मानला जाणार नाही. याआधी हा कालावधी ब्रेक मानला जात होता. या कालावधीत जर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याला EDLI स्कीमचा लाभ मिळत नव्हता. दरम्यान, आता या नियमांमध्ये बदल झाला आहे.

किमान विम्याची रक्कम

ईपीएफओने विमा रक्कमेबाबतदेखील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता जर कर्मचाऱ्याचा मृत्यू होण्यापूर्वी त्याच्या १२ महिने काम केले नव्हते आणि पीएफ खात्यात ५०,००० रुपये होते. त्यांच्या कुटुंबियांना ५०,००० रुपये मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Test: ब्लड टेस्ट तुम्हाला सांगू शकते मृत्यू धोका; नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

Sangli Nagarpalika Election: शिंदेंनी भाजपच्या सत्तेला सुरुंग लावला; सांगलीत ५५ वर्षानंतर सत्तांतर

टायगर अभी जिंदा है! सुजय विखेंची प्रतिकात्मक वाघ घेऊन एन्ट्री |VIDEO

Politics: ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आला, लगेच शिंदेंच्या शिवसेनेत गेला; तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राजकारण घडलं

Maharashtra Nagar Palika Election Result Live: पैठणमध्ये दोन पराभूत उमेदवारांमध्ये वाद; दोन्ही उमेदवारांच्या गटाकडून दगडफेक

SCROLL FOR NEXT